Home वरोरा अत्यंत दुर्दैवी :- शेतातील जनावरांचा गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग, 7 जनावरे जागीच...

अत्यंत दुर्दैवी :- शेतातील जनावरांचा गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग, 7 जनावरे जागीच जळून खाक.

संजय वासुदेव येडमे यांच्या बामर्डा येथील शेतातील दुर्दैवी घटना, ५ गायी २ वासर गंभीर जखमी, लाखोंचे नुकसान.

माढेळी प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील बामर्डा पो. सोईट येथील संजय वासुदेव येडमे यांचा शेतातील जनावरांचा गोठ्याला काल रात्री इलेक्टिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून यामध्ये ३ दुधाच्या गाई, १ मैस व ३ वासरू जागीच आगीत होळपळून मरण पावले तर २ मैस , ५ गायी व २ वासर जखमी झाले आहे, रात्री झालेल्या या आकस्मिक घटनेने येडमे परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे, दरम्यान या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनं येथे देऊन संबंधित कार्यालयाला माहिती देण्यात आली आहे.

काल झालेल्या या घटनेमुळे संजय येडमे यांचे अंदाजे किंमत ४ लाखांचे नुकसान झाले आहे तर १ लाख किमतीचा चाऱ्यांचे नुकसान असे मिळून एकूण ५ लाखांचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्थानिक तहसीलदार तलाठी यांनी घटना पंचनामा महत्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here