Home Breaking News हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालून मित्राच्या बंगल्यासाठी ९५ लाख रुपयांचा निधी?

हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालून मित्राच्या बंगल्यासाठी ९५ लाख रुपयांचा निधी?

हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालून मित्राच्या बंगल्यासाठी ९५ लाख रुपयांचा निधी?

मित्रासाठी नागरिकांच्या घरांत पाणी शिरले तरी चालेल पण मित्राच्या घरांत पाणी शिरायला नको आमदार किशोर जोरगेवार यांची भूमिका?

 

चंद्रपूर :-  राजकीय दबाव आणि सरकारी निधीच्या गैरवापराबद्दल एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. स्थानिक आमदार किशोर जोगरगेवार यांच्या मित्राच्या बंगल्यासाठी ९५ लाख रुपयांचा शासकीय निधी खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांत संतापाची लाट आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

गेल्या काही वर्षांपासून हवेली गार्डनकडे जाणाऱ्या नाल्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत होते. या समस्येचा उपाय म्हणून आमदार जोगरगेवार यांनी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, आणि काम सुरू झाले.

परंतु, हे काम सुरू झाल्यावर नागरिकांना धक्का बसला, कारण भिंत फक्त एका व्यक्तीच्या बंगल्याच्या सुरक्षेसाठी बांधण्यात येत होती. त्या ठिकाणी नागरी वस्ती नाही, फक्त जोगरगेवार यांच्या मित्र पवन सराफ यांचा बंगला आणि भूखंड आहे. यावर स्थानिक नागरिकांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे की, सरकारी निधी एका व्यक्तीच्या फायदेशीर कामासाठी खर्च करणे योग्य आहे का?

ही सुरक्षा भिंत बांधताना अनेक नियमांची उल्लंघन केली गेली आहेत, आणि नाल्याची दिशा बदलून टाकली गेली आहे, ज्यामुळे पावसाळ्यात अधिक पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रशासनावर आरोप करण्यात आले आहेत की, त्यांनी राजकीय दबावाखाली काम सुरू ठेवले.

मनपा प्रशासनही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना निष्क्रिय दिसत आहे, आणि नागरिकांच्या तक्रारींची कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. प्रशासनाने त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.

वर्तमान परिस्थितीत या प्रकरणावर अधिक खोलात चौकशी होणे आवश्यक आहे, कारण हे फक्त निधीच्या अपव्ययाचे मुद्दे नाहीत, तर लोकांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या धोका आणि कायद्याच्या उल्लंघनाच्या गंभीर बाबी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here