जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे होणार तक्रार, धमकी देणाऱ्या त्या अमोल ची रेकॉर्डिंग व्हायरलं?
चंद्रपूर :-
जिल्ह्यात कुठलेही रेती घाट लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचा व्यवसाय काही महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरु आहें, दरम्यान PWD च्या कंत्राटदारांना विकास कामासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काही रेती घाट देण्यात आले, मात्र ज्या कंत्राटदार यांना हे रेती घाट मिळाले त्यांनी काही राजकीय वरदस्त असणाऱ्या पदाधिकारी यांना सोबत घेऊन खुल्या मार्केट मध्ये रेती विक्रीचा चा व्यवसाय जोरात चालवला असल्याची सर्वत्र चर्चा आहें, अशातच ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल व यु ट्यूब चैनेलचे संपादक अनुप यादव यांनी पिपरी रेती घाट पर शिवा, राशीद, अमोल, शाम, पारस का रेत सम्राज्य! प्रशासन मौन कयों? या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची मिरची अमोल नावाच्या राजकीय रेती माफियाला झोम्बली आणि त्यांनी अनुप यादव यांना भ्रमणध्वनी वरून बातमी का लिहिली असे म्हणून पाहून घेण्याची धमकी दिली.
राजकीय पाठबळ असलेले व रेतीच्या धंद्यात उतरलेले अनेक रेती माफिया आपल्या नेत्यांच्या भरोशावर महसूल व पोलीस प्रशासनासोबत चांगले संबंध ठेऊन असल्याने त्यांना जणू वाटतंय की आमचं कुणी काहीही बिघडवू शकत नाही, जिथे रेती घाट हा शासकीय कामासाठी PWD च्या कंत्राटदार यांना मिळाला तिथे हे राजकीय पाठबळ असणारे पदाधिकारी कार्यकर्ते जणू तो रेती घाट आपल्यालाचं मिळाला अशा तोऱ्यात खुलेआम रेती चोरी करून ती खुल्या बाजारात विकतात, रेती घाटावर सिसिटीव्ही कैमेरे असले तरी रात्रीच्या अंधारात रेती घाटात पोकलेनं व जेसीबी मशीन द्वारे रेतीचा उपसा करून शासनाचा महसूल बुडवितात, मात्र याबद्दल पत्रकारांनी बातमी प्रकाशित केली की तो रेती घाट माझा आहें असे म्हणत अमोल सारखे छुटभय्ये नेते पत्रकारांना जर धमकी देतं असेल तर मग प्रशासन व्यवस्था नेमकी काय करताहेत? हा प्रश्न पडतो, दरम्यान ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल व युट्युब चैनेल चे संपादक अनुप यादव यांना अमोल नावाच्या रेती माफियानी भ्रमणध्वनी भरून धमकी
दिल्याची ऑडिओ व्हायरलं होत आहें, या संदर्भात आता पत्रकाराची एक टीम जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती असून पिपरी रेती घाट ज्या कंत्राटदार यांना मंजूर करण्यात आला त्यांचेवर करवाई करा व त्यांच्या कंत्राटी एजन्सीला काळ्या यादीत टाका अशी मागणी करणार असल्याचे विशेष सूत्रांकडून कळाले आहें.