“भूमिपुत्राची हाक”च्या बातमीचा दणका! मनपा अधिकाऱ्यांचे तात्काळ लक्ष, नालेसफाई सुरळीत – नागरिकांत समाधान
चंद्रपूर :- (प्रतिनिधी भूमिपुत्राची हाक साप्ताहिक व पोर्टल) स्थानिक जनतेच्या समस्या व सामाजिक विषयांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या “भूमिपुत्राची हाक साप्ताहिक व पोर्टल” ने पुन्हा एकदा आपल्या जनहितकारी पत्रकारितेचा ठसा उमटवला आहे. दत्तनगर परिसरातील अपूर्ण व अडथळाग्रस्त नालेसफाईबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीचा तात्काळ परिणाम दिसून आला असून, चंद्रपूर महानगरपालिकेचे अधिकारी त्वरेने हालचालीत आले आहेत. त्यांनी या परिसरात पाहणी करून संपूर्ण नाल्याची योग्यरीत्या सफाई पूर्ण केली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासन शहरात नालेसफाईची मोहीम राबवत आहे. मात्र, नागपूर ओळीतील दत्तनगर जवळील नाल्याजवळ मोठ्या प्रमाणावर घाण साचली होती, त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात होती. “भूमिपुत्राची हाक” या पोर्टलने ही वस्तुस्थिती सत्यतेसह नागरिकांसमोर मांडली आणि लगेचच प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
प्रशासनाने तत्काळ हालचाल करत स्वतः या भागात पाहणी केली व नालेसफाईच्या कामाला गती दिली. आता हा नाला संपूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांचे आभार मानले असून, वेळेवर केलेल्या कृतीमुळे संभाव्य संकट टळल्याची भावना व्यक्त केली आहे.
हवेली गार्डन रोडवर नुकतीच उभी केलेली एकतर्फी संरक्षण भिंत पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह रोखण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नाल्यांची अडथळा विरहित सफाई अत्यंत आवश्यक होती, हे “भूमिपुत्राची हाक” च्या बातमीमुळे अधोरेखित झाले.
या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, “भूमिपुत्राची हाक साप्ताहिक व पोर्टल” नेहमीच नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या समस्या आणि सामाजिक मुद्द्यांवर निर्भीडपणे बातम्या प्रकाशित करत असते. त्यामुळे या माध्यमाचे नाव आज संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे साप्ताहिक व पोर्टल आज सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाने व प्रतिष्ठेने उभे राहिले आहे.