Home चंद्रपूर शिवप्रेमीवर गंभीर गुन्हे दाखल, मग दलित विधवा महिलेचे घर पाडले ते गुंड...

शिवप्रेमीवर गंभीर गुन्हे दाखल, मग दलित विधवा महिलेचे घर पाडले ते गुंड व बिल्डर मोकळे कसे ?

शिवछत्रपतीचा अपमान करणाऱ्या दलिताला  मारणारे शिवप्रेमी गुन्हेगार ठरतात तर दलित विधवा महिलेचे तलवारी चाकू छूऱ्याचा धाक दाखवून बुलडोजरने घर पाडणाऱ्या गुंडावर गंभीर गुन्हे कां नाही ? पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्काळ दखल घेण्याची गरज! 

लक्षवेधी :-

कुठलाही कायदा मोडला की गुन्हा ठरतो हे जरी लोकशाहीमधे ठरलेलं असलं तरी कायदा हा फक्त काही लोकांसाठीच आहे आणि बाकीच्यांना कायद्यातून सूट मिळते हे चित्र बहुतांश वेळी आणि बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात बघावयाला मिळते तेंव्हा मात्र असं वाटतं की कायदा हा श्रीमंत आणि गुंड प्रव्रुतीच्या लोकांना लागू नाही, नव्हे पोलिसांची तिथे डाळ गळत नाही आणि त्यामुळेच भारतीय संविधानामधे स्वातंत्र्य समता बंधूता ही जी त्रिसुत्री आहे, त्यामधील समता ह्या घटनादत्त अधिकाराला आपलेच कायद्याचे रक्षणकर्ते पायदळी तुडवतात, तेंव्हा मग हेच काय डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे राज्य ? हा प्रश्न कळायला मार्ग नसतो.

चंद्रपूर शहर अपेक्षा नगरातील दलित विधवा असलेल्या कल्पना सोनवणे ह्या महिलेचे घर गर्भश्रीमंत असलेल्या बिल्डर गजानन निलावार व दत्तात्रय कन्चर्लावार यांच्या सांगण्यावरून व सुपारी देवून गुंड प्रव्रुत्तीचे भरत गुप्ता व काही महिला बुलडोजरने पाडतात, त्या दरम्यान विरोध करणाऱ्या पिडीत कुटुंबातील सदस्यांना व आजूबाजूच्या घरवाल्यांना तलवारी चाकू छुरी दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या जाते व आपल्यावर ही बाब येवू नये म्हणून पिडीत महिलेला जबरदस्तीने एका स्टंप पेपरवर सह्या करून एक लाख रुपये दिल्याचे फोटो काढल्या जावून नंतर ते एक लाख रुपये ते गुंड परत घेतात आणि जर पोलिस स्टेशन मधे गेले तर सर्वांना जीवे मारून टाकू अशी धमकी त्या गुंडाकडून दिली जाते, नंतर या घटनेची वाच्यता शिवसेनेचे पदाधिकारी जेंव्हा करतात तेंव्हा पोलिस केवळ साधारण गुन्हे दाखल करून श्रीमंत बिल्डर व गुंड यांना वाचविण्यासाठी थातूर मातूर कारवाई दाखवून त्या गरीब दलित विधवा महिलेला वाऱ्यावर सोडतात, तेंव्हा सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी कुठल्या बिळात गेले असतील माहीत नाही. मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र राऊत यांच्यावर जेंव्हा शिवप्रेमी हल्ला करतात तेंव्हा कायदा आपले काम कसे काय करतोय ?
खरं तर एका घटनेत श्रीमंतांच्या फायद्यासाठी गुंड प्रव्रुत्तीच्या लोकांना सुपारी देवून गरीब दलित विधवा महिलेचे घर जमीनदोस्त केल्या जाते, तर दुसऱ्या घटनेत महाराष्ट्राच्या राजाची बदनामी करणाऱ्या व दलित असणाऱ्या जितेंद्र राऊत या समाजकंटकांला शिवप्रेमी धडा शिकवतात, या दोन्ही घटना कायदा तोडणाऱ्या असल्या तरी पहिली घटना ही दलित विधवा व अतिशय गरीब महिलेच्या बाबतीत असल्याने व त्यातच तिचे घर तलवारी चाकू छूऱ्याचा धाक दाखवून बुलडोजरने गुंड जमीनदोस्त करतात त्यामुळे ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेला काळिमा फासणारी असतांना देखील पोलिस आरोपीवर साधारण गुन्हे दाखल करून मोकळी होतात, आणि याच महाराष्ट्राचे वैभव ज्यांच्या नावानी अख्ख्या विश्वाला कळालं त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजानी महिलांना नेहमीच सन्मान दिला त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह  मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या दलित नेत्यावर शिवप्रेमी हल्ला करून त्याला माफी मागायला लावतात तर तो मोठा गुन्हा ठरतो ? आणि त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये पोलिसाकडून गुन्हे  दाखल केल्या जाते ? मग हेच कां ते शिवछत्रपतीच राज्य ? असे काळजाला भिडणारे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात,

शिवछत्रपतीच्या राज्यात जनता सुखी आणि समाधानी असायची कारन त्यांच्या स्वराज्यात कुणावरही अन्याय झाला तर राजे कडक शिक्षा करायचे, मात्र आता त्यांच्याच नावानी राज्य करणारी सत्ताधारी मंडळी व पोलिस प्रशासन गरीब दलित व विधवा महिलेवर अन्याय होतं असतांना व तिचे कुटुंब उघड्यावर आले असतांना श्रीमंतांची आणि गुंडांची बाजू घेतात तर मग हे शिवछत्रपतीचे राज्य कसे ? हे राज्य जर खरोखरच शिवछत्रपतीचे असते तर गरीबावर अन्याय झाला नसता पण आपले राज्यकर्ते हे सुद्धा पापाचे भागीदार आहेत. गरीबावर अन्याय करतांना लोकप्रतिनिधी जेंव्हा डोळे मिटून गप्प आहे तर विश्वास ठेवायचा तो कुणावर ? हा प्रश्न आता महाराष्ट्रात गंभीर बनला असून खुलेआम कायदा हातात घेऊन कुणाचेही घर तलवारीच्या नोकवर पाडणाऱ्यांची दादागिरी आता वाढायला लागली आहे. पण आश्चर्याची बाब ही आहे की एकीकडे बाबासाहेबांच्या नावावर एक असणारा समाज आता त्याचं समाजाच्या विधवा महिलेचे अस्तित्व पणाला लागले असतांना गप्प कां ? असा प्रश्न सुद्धा त्या अर्थाने अतिशय गंभीर आहे.
या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीने एका दलित नेत्यावर झालेल्या मारहाणीची दखल घेवून शिवप्रेमीनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मूक संमती दिली तशीच संमती नव्हे आदेश पोलिस प्रशासनाला देवून या महाराष्ट्रात एका गरीब दलित विधवा महिलेला न्याय देण्यासाठी गुंडांना सुपारी देणाऱ्या बिल्डरावर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी आर्त हाक पिडीत महिला करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here