उबाठा चे जिल्हाप्रमुख भीतीपोटी भाजप च्या गोटात, मनसे व आरक्षण बचाव संघर्ष समिती तर्फे पुन्हा पाठपुरावा करणार.
आमदार मुनगंटीवार यांनी स्थानिक पोलीस अधीक्षक यांच्याकडे एसआयटी चे सूत्र दिल्याने सीआयडी चौकशीची मागणी.
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून त्याचं पैशाच्या बळावर निवडनुका जिंकणारे बैंकेचे काही जुने संचालक एसआयटी च्या चक्रव्यूहात आता फसले आहें, दरम्यान कधी काळी मनसेचे राजू कुकडे काय करणार? आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनात काय दम आहें असे म्हणणारे आणि श्रीमंतांच्या मुलांकडून लाखों रुपये घेऊन नोकरी देणारे संचालक आता एसआयटी चौकशी च्या भीतीपोटी बैंकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यासाठी उबाठा चे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांना भाजप मध्ये पाठवून एसआयटीच्या चक्रव्यूहातुन स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहें.
पैशाच्या बळावर न्यायालयात सुद्धा आपल्या बाजूने निर्णय फिरविणारे बैंकेचे जुने सत्ताधारी संचालक आता मात्र एसआयटी च्या माध्यमातून आपले पितळ उघडे पडतील या भीतीने सत्ताधारी भाजप पक्षात आपला मोहरा पाठवतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात याबद्दल आता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी यांचे खरे चेहरे ओळखले आहें, कारण ज्या शेतकऱ्यांच्या शेअर्सच्या बळावर ही बैंक उभी आहें त्या ओबीसी एससी, एसटी समाजाच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण न देता परस्पर पैसे घेऊन भरती घेतात, महत्वाची बाब म्हणजे ज्या आरक्षणाने बैंकेचे संचालक निवडले जाते त्या बैंकेत आरक्षण असू नये हा मोठा गंभीर प्रकार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अनेक राजकीय सामाजिक संघटनाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती विरोधात जें आंदोलन केले व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी शैलीत विधानसभेत त्यांनी जी गर्जना केली आणि सहकार विभागाची लक्तरे बाहेर काढली त्यामुळे शासनाला एसआयटी चौकशी लावावी लागली.
नोकर भरतीत पैसे घेणाऱ्या त्या संचालकांना एसआयटी च्या नोटीसा.
बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, ‘नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ‘एसआयटी’ने त्या नोकर भरती करिता पैसे घेणाऱ्या घोटाळेवाज संचालकांना नोटीसा दिल्या असल्याची माहिती आहें, आता त्या नोकर भरतीत आपले पितळ उघडे पडेल या भीतीने नोकर भरती करणाऱ्या त्या भ्रष्ट टोळीने आपला मोहरा भाजप मध्ये पाठवून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे दिसत आहें. त्यात बँकेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, माजी संचालक शेखर धोटे, संदीप गड्डमवार, दामोदर मिसार, तत्कालीन उपाध्यक्ष यशवंत दिघोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांचा समावेश आहें, मात्र या नोकर भरतीत पडद्यामागे नोकर भरतीत सक्रिय भूमिका निभाविणारे शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांना नोटीस मिळाली नसल्याची माहिती आहें.
खरंच त्या संचालकांवर कारवाई होऊन भरती रद्द होईल का?
बैंकेच्या नोकरभरतीत घोटाळा झाला व त्या विरोधात आंदोलन उभारले गेले आणि विधानसभेत मुद्दा उपस्थित झाला त्यामुळे राज्य सरकारने एसआयटी चौकशी लावली आणि चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांची चौकशी प्रमुखपदी नियुक्त केली असून त्यांनी चौकशीचा वेग वाढवत सहकार मंत्र्यांची मुंबई येथे भेट घेऊन यातील बारकावे समजून घेतल्याचे कळते. मात्र खरंच योग्य ती प्रामाणिकपाने चौकशी होईल का याबद्दल अनेकांना संशय आहें मात्र यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती यासाठी नियमित पाठपुरावा करून चौकशी अधिकारी यांना माहिती देणारं असल्याचे सांगण्यात येत आहें.
‘सीआयडी’ चौकशी करण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाने अख्ख्या महाराष्ट्रात चंद्रपूर ची नोकर भरती गाजली आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्रमक पवित्र्याने एसआयटीची स्थापना सरकार ला करणे भाग पडले मात्र, पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी सोपवल्याने मुनगंटीवार यांनी निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ‘सीआयडी’ चौकशीची मागणी केली. त्यांनी याबाबत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली व राज्यात अनेक आयपीएस अधिकारी असताना स्थानिक अधिकारी नको कारण त्याचेवर राजकीय दबाव येऊ शकतो त्यामुळे त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना बदलण्याची विनंती केली