Home Breaking News महानगरपालिकेच्या रणधुमाळीत “युवा नेते” ठरत आहेत लोकांच्या आशेचा किरण! | निवडणूक तयारीला...

महानगरपालिकेच्या रणधुमाळीत “युवा नेते” ठरत आहेत लोकांच्या आशेचा किरण! | निवडणूक तयारीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

🚩 महानगरपालिकेच्या रणधुमाळीत “युवा नेते” ठरत आहेत लोकांच्या आशेचा किरण! | निवडणूक तयारीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
वडगाव (चंद्रपूर)  :-  येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्र. ८ मधून “युवा नेतृत्व” ठामपणे पुढे येत आहे. स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत युवा कार्यकर्ते राहुल शेखर वाढई आणि सोहम सुदर्शन बुटले यांनी जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे

📌 निवडणूक तयारी जोरात – जनसंपर्कात वाढ!

राहुल-व- सोहम कॅबच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने काम सुरू आहे. नागरिकांच्या छोट्या-मोठ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही, परिसरातील स्वच्छता व नाल्यांची देखभाल, रस्ते सुधारणा – या सर्व बाबींमध्ये युवा टीमने पुढाकार घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साह असून, “या वेळी युवा नेतृत्वालाच संधी द्यायची” हा सूर अधिकाधिक बुलंद होताना दिसत आहे.


📍 नागरिकांचा मोठा प्रतिसाद – परिवर्तनाची चाहूल!

प्रभागातील महिला, वृद्ध, युवा वर्ग यांचा या नेतृत्वाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी जाऊन केलेला जनसंपर्क, प्रत्येक समस्येवर केलेले ठोस काम, आणि ‘सेवेसाठी सदैव सज्ज’ ही भावना यामुळे राहुल-व- सोहम कॅब हा लोकांच्या विश्वासाचा ब्रँड बनत चालला आहे.


🎯 “युवा नेते, नव्या अपेक्षा – महानगरपालिकेसाठी ठाम उमेदवारी!”
या निवडणुकीत “स्वच्छता, सुविधा आणि सहकार्य” हे त्रिसूत्री धोरण घेऊन राहुल-व- सोहम कॅब मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

🗣️ राहुल वाढई आणि सोहम बुटले यांचे वक्तव्य :
“हे प्रभाग आमचं कुटुंब आहे. इथे प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा आमचा वैयक्तिक विषय आहे. निवडणूक ही केवळ राजकारण नाही, तर जनतेची सेवा करण्याची संधी आहे.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here