खंडणीच्या दोन ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यात खोब्रागडे फरार झाल्यानंतर काल रात्री नागपूर वरून अटक केल्याची माहिती.
चंद्रपुरः-
जिल्ह्यात आपल्या विविध प्रकरणात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार सारख्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून न्यायालयात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे व त्या संबंधाने वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन मी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले मी जागृत नागरिक आहें, मी राष्ट्रीय दर्जाचा तलाठी आहें आणि मी वकील आहें ह्या तोऱ्यात वावरणारे विनोद खोब्रागडे स्वतःचं दोन ठिकाणी झालेल्या तक्रारी वरून अखेर खंडणीच्या गुन्ह्यात अडकले असून काल रात्री त्यांना चंद्रपूर पोलिसांनी नागपूर वरून अटक केल्याची माहिती आहें. दरम्यान आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांची जेल मध्ये रवानगी केली मात्र तब्बेत बिघडल्याचे नाटकं करून तें आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहें
बल्लारशाह निवासी बादल खुशालचंद्र उराडे यांनी बाबा उरकुडा रत्नपारखी (राहणार तुकुम, चंद्रपुर) व विनोद कवडुजी खोब्रागडे (निवासी- आशीर्वाद नगर, वरोरा) यांच्यावर गंभीर आरोप लावून बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती की ह्या दोघांनी ₹25 लाख की खंडणी मांगीतली व जर पैसे दिले नाही तर खोट्या केसेस मध्ये फसविण्याची धमकी दिली त्यावरून भारतीय न्याय संहिता 2023 कलम 308(4), 356(2), 3(5) के अंतर्गत बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये विनोद खोब्रागडे यांचेवर गुन्हे दाखल झाले होते, दरम्यान चंद्रपूर न्यायालयात दोन वकिलांना सुद्धा त्यानी खोट्या गुन्ह्यात अडकवले होते व त्यातून सुटका पाहिजे असल्यास 50 लाख रुपये वकिलांना मागितल्याचा आरोप त्यांचेवर होता त्यामुळे सर्व वकील एकत्र येऊन त्यांनी विनोद खोब्रागडे यांची रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली त्यावरून सुद्धा गुन्हे दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने तें अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात त्यांनी अपील केली मात्र तिथे सुद्धा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नाकारल्याने अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली आहें, त्यांनी आजपर्यंत किती लोकांना त्रास दिला त्यानी कुणाकुणाला पैसे मागितले याची संपूर्ण चौकशी होणार असून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना जेल मध्ये टाकण्याचा आदेश झाला मात्र तब्बेतीचे नाटकं करून तें सध्या सरकारी रुग्णालयात भरती आहें पण सोमवार मंगवारला बल्लारापूर पोलीस त्यांना अटक करू शकतात.