आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचा पुराव्यासह आरोप, दुसरा विभुते पकडला जाऊ नये म्हणून RTO अधिकाऱ्याची करामत?
RTO चा पंचनामा भाग:-19
प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होतं असल्याच्या बातम्या आणि प्रत्यक्षात RTO अधिकारी त्यात लिप्त असल्याचे एसीबीच्या कार्यवाहीवरून समोर येत असलेले पुरावे बघता खरं तर प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) म्हणून जबाबदारी सांभाळणारे किरण मोरे यांची तात्काळ चौकशी करून त्यांचेवर गुन्हे दाखल व्हायला हवे, कारण RTO कार्यालयाचा मोरक्या म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा उभी करून भ्रष्टाचाराचा नंगानाचं सुरु केला आहें, कधी काळी सर्वसामान्य जनतेचा आवाज RTO अधिकारी ऐकायचे, मात्र आता मुजोर RTO अधिकारी किरण मोरे यांनी आपली मनमानी करून जनतेच्या पैशाची जणू लूट चालवली आहें, त्यात मोठामोठ्या ट्रान्सपोर्टर यांच्या कडून हप्ता घेऊन बेकायदेशीर वाहतूक करण्यास व गाड्यांचे कागदपत्र नसताना त्यांना वाहन चाळविण्यास खुली सूट द्यायची आणि गोरगरीब एक गाडी चालविणाऱ्या गाडी मालकाकडून एंट्री फी च्या नावाखाली लुट करायची व एंट्री फी दिली नाही तर गाडी चालन करण्याचा त्रास देऊन त्याला देशोधडीला लावायचे पातक RTO अधिकारी करत आहें, मात्र हा संपूर्ण प्रकार उजेडात आणणाऱ्यांविरोधात पोलीस केस करायची हा जुना खेळ अजूनही इथे सुरु असून आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी ट्रक चालकांकडून 500 रुपये RTO अधिकारी घेत असल्याचा व्हिडीओ घेत असल्यामुळे आपले बिंग फुटेल त्यामुळे उलट मयूर राईकवार यांच्या सह इतरावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा खळबळजनक आरोप मयूर राईकवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहें.
काही महिण्यापूर्वी मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुतें यांना याच सिमा नाक्यावर ट्रक चालकाकडून ५०० रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अमरावती टीम ने रंगेहात पकडले होते, एवढेच नव्हे तर त्या अगोदर मोटार वाहन निरीक्षक करमरकर यांना पण तत्कालीन एसीबी पोलीस अधीक्षक जैन यांनी पकडले होते त्यामुळे हा सिमा नाका RTO अधिकाऱ्यांचा बेकायदेशीर वसुलीचा अड्डा बनला आहें, मात्र याबाबत कुणी पोलखोल केली तर त्यांनाच टॉरगेट करून पोलिसांत गुन्हे दाखल करायचे हा RTO अधिकाऱ्याचा फंडा आजही तसाच आहें, मात्र यामध्ये हा भ्रष्टाचार उघडं करणाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्या जाते आणि भ्रष्टाचार करणारे RTO अधिकारी कोट्यावधीची बेकायदेशीर वसुली करत असतांना सुद्धा त्यांना संरक्षण दिल्या जाते हें लोकशाहीची एक प्रकारे हत्त्या असून कायदाच पायदळी तुडविणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या त्या परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त यांच्या विरोधात खरं तर न्यायालयातुन गुन्हे दाखल व्हायला हवे, कारण पुराव्यासह तक्रार देतांना जर दोषी RTO अधिकारी यांच्यावर कारवाई नं करता त्यांचे संरक्षण होतं असेल तर संरक्षण देणारे सुद्धा आरोपी आहें
काय आहें लक्कडकोट सिमा नाक्याचा प्रकार.
या सिमा नाक्यावर सतत ट्रक चालकांकडून 500 रुपये घेत असल्याचा खेळ सुरु असल्याची माहिती पुढे येत असल्यामुळे काही ट्रक चालकांनी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचेकडे तक्रार केली होती, दरम्यान स्वतः मयूर राईकवार याबाबत सत्यता पडताळणी करिता त्या सिमा नाक्यावर अर्जुन धुन्ना नावाच्या पत्रकाराला घेऊन गेले आणि त्यांनी पडताळणी केली मात्र त्या दिवशी मोटर वाहन निरीक्षक योगिता राणे ह्या महिला अधिकारी ड्युटीवर होत्या, त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आपल्या इतर अधिकाऱ्यांना ही माहिती दिली की कुणीतरी सिमा नाक्यावर येऊन शूट करत आहें, त्या दरम्यान RTO अधिकारी तिथे आले आणि मयूर राईकवार यांची गाडी थांबवली. त्यांना नाव, ओळखपत्र गाडीची आरसी मागून चौकशी करण्यात आली. यावेळी पत्रकार धुन्ना यांनी आपली ओळख सांगितली व माझा मोबाईल नंबर घ्यावा असे म्हटले असता त्याठिकाणी कांबळे नामक मोटार वाहन निरीक्षक हा अधिकारी म्हणतो कि आधी फ्रेंडशिप होऊ द्या मग नंबर घेतो. तुम्ही इथे व्हिडीओ का काढत आहे, मोबाईल बंद करा अशी अरेरावी राईकवार यांच्यासोबत तें करत होते, यावेळी अधिकाऱ्याकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला.
RTO किरण मोरे अगोदरचं एसीबी च्या रडारवर?
लक्कडकोट सिमा नाक्यावर 500 रुपयाची ट्रक चालकांकडून लाच घेतांना मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्या सह एका खाजगी एजंट ला रंगेहात अमरावतीच्या एसीबी टीम ने पकडले होते, मात्र जर शिवाजी विभुतेने आपले नाव घेतले तर आपल्याला पण एसीबी जाळ्यात ओढेल या भितिने अमरावती च्या एसीबी टीम ला RTO किरण मोरे यांनी एका मोठया ट्रान्सपोर्टर कडून 50 लाख रुपये घेऊन दिले असल्याची बातमी चार वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली होती, दरम्यान त्या बातमीचा संदर्भ घेऊन मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलावार यांनी राज्याचे एसीबी महासंचालक यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारी वरून RTO किरण मोरे आणि सहाय्यक RTO आनंद मेश्राम यांची चौकशी होणार आहें, त्यामुळे जर आता ट्रक चालकांकडून 500 रुपये घेतल्याची बातमी पुराव्यासह झळकली असती तर RTO किरण मोरे पूर्णतः फसणार होते आणि म्हणून आपली बला त्यांनी भ्रष्टाचार उघडं करणाऱ्या मयूर राईकवार यांच्यासह त्यांचे साथीदार अर्जुन धुन्ना यांचेवर ढकलली असल्याचा प्रकार स्वतः राईकवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केला.