Home चंद्रपूर दिनविशेष :- राजकारणाच्या पलीकडंच जनतेची आस्था असणारं व्यक्तीमत्व म्हणजे सुधीरभाऊ..

दिनविशेष :- राजकारणाच्या पलीकडंच जनतेची आस्था असणारं व्यक्तीमत्व म्हणजे सुधीरभाऊ..

पक्षांतर्गत झालेल्या कुरघोडी ला फाटा देत जनतेचा आवाज बनलेल्या सुधीरभाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…

दिनविशेष:-

महाराष्ट्राचा राजकीय परिपाट सध्या संपुर्णपणे बदलून गेला आहे. फक्त सत्ता कशी मिळावायची आणि त्यासाठी कुणाची हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करून स्वतःचं भलं करायचं एवढा एककलमी कार्यक्रम आमदार खासदार आणि राजकारणी नेते मंडळीचा सुरु आहे, सत्तेसाठी कुठल्याही प्रकारच्या तडजोडी स्वीकारणे ही अत्यंत सामान्य बाब झाली आहे. ‘तत्त्वनिष्ठा’ हे शब्द आता बासनात गुंडाळले गेले आहे. ‘गिव्ह अँड टेक’ चं हे राजकरण खेळलं जातंय पण यातून जनतेला मूर्ख बनवलं जातंय, अशा या गलिच्छ राजकारणात जनतेच्या हक्क अधिकारासाठी लढणारा एक योद्धा मात्र त्याला अपवाद ठरत असून राजकारणाचा बळी ठरलेला तों योद्धा आजही लढत आहे त्या आदर्श राजकारणी जनसेवक सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आज (30 जुलै) वाढदिवस म्हणजे लाखों युवा राजकारणी यांना प्रेरणा देणारा आहे,

खरं तर सुधीरभाऊ राज्याच्या मंत्रिमंडळात नाहीत हे त्यांचं दुर्भाग्य नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचं दुर्भाग्य आहे, पण मंत्री नसलं म्हणून काय झालं सत्तेच्या वर्तुळात अजूनही त्यांची जोरदार चर्चा आहे, त्यांना विधानसभा अध्यक्ष पद मिळेल त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे सध्याच्या महायुतीच्या सत्ताकाळात त्यांनी आपल्या अभ्यासू भाषनाने जें दोन अधिवेशन गाजवले ते सर्वसामान्य जनतेच्या मनाचा वेध घेणारे ठरले, कारण जनतेला हे एका सत्ताधारी नेत्यांकडून अपेक्षित होतं ते मंत्री नसताना सुधीरभाऊंनी करून दाखवलं, खरं तर विधानसभा सभागृहात ते जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा संपुर्ण सभागृह त्यांना शांतपणे ऐकते. सत्तावर्तुळ, विरोधीपक्ष, नोकरशाही असो की सामान्य माणूस सर्वत्र सुधीरभाऊंचा आदर आजही अबाधित आहे. नवे सरकार आल्यानंतर आतापर्यंत झालेल्या दोन्ही अधिवेशनातं सुधीरभाऊंनी आपल्या वक्तृत्व व अभ्यासू भाषण शैलीत आपल्याच सत्ताधारी यांना कोंडीत पकडलं तेंव्हा विरोधी बाकावर बसणाऱ्या आमदारांनी सुद्धा सुधीरभाऊंच्या त्या आक्रमक शैलीला आणि त्यांच्या अभ्यासू भाषणाला दाद दिली हे सुधीरभाऊंचं खरं योगदान म्हणावं लागेल.

सुधीरभाऊंची दूरदृष्टी…

राज्याच्या राजकारणात सुधीरभाऊ म्हटलं की त्यांच्या दूरदृष्टी राजकारणाची झलक नेहमीच दृष्टीपथास येते, पाहिल्यांदा जेंव्हा 2014 ला अर्थ, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री ही महत्वाची खाती जेंव्हा त्यांना देण्यात आली होती, त्यावेळी सुधीरभाऊंनी आपल्या कामाच्या धडाडीने निर्णयक्षमता व कल्पकतेने ही सर्व खाती समर्थपणे सांभाळून अर्थमंत्री म्हणून त्यांनी शेवटचा शिल्लकी अर्थसंकल्प मांडला हे सर्वजण मान्य करतात. कारण मनात आणल्यास सरकार काय करु शकतं, याची प्रचिती वेळोवेळी सुधीरभाऊंनी आपल्या कामातून दाखवून दिली आहे, आज मात्र त्यांना सत्तेतून बेदखल करून सत्ताधारी यांनी मोठी चूक केली अशी राज्यात सर्वत्र चर्चा आहे.

मंत्री कसा असावा याचा सुधीरभाऊनी ठेवला आदर्श..

सध्या राज्यात सत्ताधारी मंत्री कसे वेडेवाकडे वागतात आणि सत्तेचा दुरुपयोग करून जनतेचा विश्वास कसा घालवतात असं चित्र दिसतं असतांना गेल्या सरकारमध्ये सुधीरभाऊ कडे सांस्कृतिक कार्यमंत्री सारखे खाते होते. नट, नट्यांसोबत फोटो काढणे, सांस्कृतिक कार्यक्रम, अवार्ड शो ला हजेरी लावणे आणि चित्रपटाचे अनूदान वाटणे एवढेच काम या मंत्रालयाचे असते, असे आतापर्यंत चित्र होते. मात्र या विभागाचे सूत्र हाती आल्यावर सुधीरभाऊंनी हे चित्र पालटून टाकले. महाराष्ट्रातचं महाराष्ट्र गीत हे सर्व शासकीय, निमशासकीय समारंभात वाजणे हे बंधनकारक नव्हते. सुधीरभाऊंनी एक साधा जीआर काढून राज्यगीत सर्वच शासकीय, अशासकीय कार्यक्रमात वाजवणे बंधनकारक केले. आज तुम्ही परदेशी वकालत, सिनेमा थियेटर किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा, राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लागते. आणि सर्व मराठी माणसांचे मन उचंबळून येते. हा निर्णय घेण्यासाठी काही पैसै लागले नाही. केवळ कल्पकता आणि प्रबळ इच्छाशक्ती लागली. आतापर्यंत महाराष्ट्रात कित्येक सांस्कृतिक मंत्री झाले मात्र महाराष्ट्राच्या राज्य गीताला सन्मान देण्यासाठी ही कल्पना त्यांना सूचली नाही त्यामुळे मंत्री कसा असावा याचा आदर्श म्हणून सुधीरभाऊकडे बघितल्या जातंय.

सुधीरभाऊ मंत्री नाहीत तरीही मंत्रापेक्षा कमी नाही…

विद्यमान महायुती सरकार मध्ये जेंव्हा मंत्रिमंडळात सुधीरभाऊंचे नाव नव्हते तेंव्हा अनेकांना धक्का बसला, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं नाव अभ्यासू नेता म्हणून आहे आणि विरोधी पक्षात राहून ज्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले, ज्यांनी आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ आणले, चंद्रपूर जिल्ह्यात बोटनीकल गार्डन असेल किंव्हा वन अकादमी असेल सुधीरभाऊंची प्रचंड इच्छाशक्ती जनतेच्या विकासाची दृष्टी ठरली आहे, मात्र पक्षांतर्गत कुरघोडी मुळे त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पण तेच सरकारच्या अंगलट आले असून आपल्या अभ्यासू भाषणाने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारे सुधीरभाऊचं स्थान फार वरचं आहे व ते आमच्या मानसपटलावर आहे असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं होतं त्यामुळे सुधीरभाऊ मंत्री नसले तरी ते मंत्र्यांपेक्षा कमी नाही हेचं दर्शवते..

आज विकासाचा महामेरू म्हणून ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात ख्याती मिळवली आणि राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचं स्थान दादासाहेब कन्नमवार जें राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते त्यांच्या योगदानानंतर टिकवलं ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवशी अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते सेवा दिवस म्हणून विविध उपक्रम राबवून गोरगरीब पिडीताना मदत व अनेक रोगांनी त्रस्त रुग्णांना उपचार देऊन सेवा देत आहे, सुधीरभाऊंना परमेश्वर उदंड आयुष्य देऊन जनतेची सेवा करण्याची उर्मी प्रदान करो व त्यांच्या हातून महाराष्ट्र घडो हिच अपेक्षा आणि त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here