Home चंद्रपूर खळबळजनक :- जुनोना चौक परिसरात अट्टल गुन्हेगाराला भावानेच गोळ्या घालून केले ठार.

खळबळजनक :- जुनोना चौक परिसरात अट्टल गुन्हेगाराला भावानेच गोळ्या घालून केले ठार.

चंद्रपूर शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावल्याची चर्चा, मारणारा आणि मारणारा दोन्ही अट्टल गुन्हेगार

चंद्रपूर:-

चंद्रपूर शहरात पुन्हा गुन्हेगारीने तोंड वर काढल्याची चर्चा असल्याची चर्चा जोरात सुरु असताना शहरातील जुनोना चौक परिसरातील हिंग्लाज भवानी जवळील विक्तूबाबा मंदिराच्या मागील भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन भावात झालेल्या आपसी वादातून लहान भावाने मोठ्या भावाची गोळी घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली, दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचारकरिता नेले असता कुणीही ही केस घ्यायला तयार नसल्याने शेवटी जिल्हा सामान्य रुग्णलयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल.

बुद्दासिंग टाक (५०) रा. जुनोना असे मृत मोठ्या भावाचे नाव आहे तर बंधूकीने वार करणारा लहान भाऊ सोनुसिंग टाक हा भावाची हत्त्या करून फरार झाला आहे. सोनुसिंग व बुद्दासिंग या दोन भावात मागील काही दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते, दरम्यान बुधवारी सायंकाळी दोघात आपसी वाद झाला. वाद ऐवढ्या विकोपाला गेला की लहान भावाने मोठ्या भावाला बंदुकीने गोळी झाडून जागीच ठार केले.

दोन्ही भावावर अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल.

मृतक व आरोपी यांच्यावर चंद्रपुर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून आरोपी सोनुसिंग टाक यांचेवर चंद्रपूर जिल्ह्यातुन तडीपाराचा आदेश नुकताच निर्गमीत करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक सुर्दशन मुमक्का, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलिस निरीक्षक आसीफ राजा यांनी भेट देत परिसरातील नागरिकांना घटनेबाबत विचारना केली दरम्यान पोलिसांचा तपास सुरु असून मृतकाची बॉडी पीएम करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here