मनसे जिल्हा उपाध्यक्ष तथा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांनी पुराव्यासह दिले एसआयटी अधिकाऱ्यांना बयान.
ज्यांना ज्यांना सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार नोंदवायची आहे त्यांनी संपर्क साधण्याचे एसआयटी अधिकाऱ्यांचे आवाहन..
चंद्रपूर :–
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून त्याचं पैशाच्या बळावर निवडणुका जिंकणाऱ्या त्या बैंकेच्या संचालकांवर एसआयटी चौकशीचे भूत घोंगावत असतांना आता प्रत्यक्षात त्या चौकशीला सुरुवात झाली आहे, दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेतर्फे बैंकेच्या नोकर भरती विरोधात तक्रार करणाऱ्या सर्व आंदोलनकर्ते व विद्यार्थी यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्यांचे बयान नोंदवणे सुरु झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांनी पुराव्यासह एसआयटी अधिकारी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या दुर्गापूर कार्यालयात बयान नोंदवले आहे. या नोकर भरती संदर्भात ज्यांच्या तक्रारी असेल आणि पुरावे असल्यास सर्वांनी आपले बयान एसआयटी चौकशी अधिकारी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती विरोधात मनसेचे राजू कुकडे यांनी आवाज उचलला व स्थानिक जिल्हाधिकारी, सहकार मंत्री विभागीय सहनिबंधक यांना याबाबत तक्रारी देऊन नोकर भरती रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र प्रत्येक उमेदवारांकडून लाखों रुपये घेऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधारी अध्यक्ष संचालकांनी सर्वांना मैनेज करून बेकायदेशीर नोकर भरती होती, मात्र या नोकर भरतीची एसआयटी द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीतर्फे करण्यात येऊन आमदार सुधीर मुनगंटीवर यांना तसें निवेदन देण्यात आले व त्यांनी विधानासभेत प्रश्न उपस्थित करून सिडीसीसी बैंकेची एसआयटी चौकशी करा व भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी लावून धरली शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्ट नोकर भरती ची एसआयटी चौकशी लावण्यात आली, परंतु ही चौकशी समिती काहीही करू शकतं नाही असा तत्कालीन सत्ताधारी यांचा प्रचार होता त्या प्राचाराला आता विराम लागला असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी यादव यांनी चौकशी सुरु केली असल्याने ते भ्रष्टाचारी संचालक यांची तारांबळ उडाली आहे.
नोकर भरतीचे काय होईल कोण जेल जाईल?
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाने सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची चौकशी लागल्याने भयभीत झालेले संचालक यांनी एक चाल खेळली आणि नोकर भरतीचे मास्टर माइंड रवींद्र शिंदे यांना भाजप मध्ये पाठवून एसआयटी चौकशी ला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु आता एसआयटी चौकशी सुरु झाल्याने व प्रत्येकांचे बयान नोंदविले जात असल्याने शेकडो तक्रारी एसआयटी चौकशी अधिकारी यांना मिळणार आहे, दरम्यान नोकर भरतीत अनेक संचालक व मोठे अधिकारी यांची नाराजी असल्याने त्यांचेकडून पण पुरावे समोर येत आहे, शिवाय प्रत्येक उमेदवार यांचे कडून किती पैसे घेतले याचे पुरावे बैंक खात्यासह समोर येणार असल्याने कोणी किती पैसे घेतले याचा अंदाज येणार असल्याने दोषी सिइओ कल्याणकार यांचेसह अध्यक्ष व संचालक यांच्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटणार आहे त्यामुळे या सर्वावर गुन्हे दाखल झाल्यास त्यांची जेल वारी निश्चित मानली जाणारं आहे.