चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ यासंह अनेक शिक्षण संस्थामध्ये बोगस भरती, मनसेच्या हातात आली यादी.
चंद्रपूर :–
राज्यातील बोगस शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन दिल्या संदर्भात राज्य शासनाने विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी चे आदेश दिले आहे, दरम्यान नागपूर सह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील शिक्षण संस्थामध्ये हा घोटाळा झाला असल्याचे समोर येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा भाजपचे नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेसह अनेक संस्था मध्ये शिक्षक शिक्षकेत्तर भरती घोटाळा झाला असल्याचे आता समोर आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जिल्हा परिषदच्या कन्नमवार सभागृहात झालेल्या गुणवत्ता शिक्षण संदर्भात आढावा सभेदरम्यान देण्यात आले, यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे,सुनील गुढे, पियुष धुपे, विजय तूरक्याल यांचेसह इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,
मनसेने दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली की चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मे 2012 नंतर शिक्षक शिक्षकेत्तर भरती बंद असताना चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत 100 च्या वर बोगस भरती करण्यात आली असून त्यापैकी काहींची नावे आपल्याकडे आल्याने या शिक्षण संस्थेच्या सचिव व अध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करावा, दरम्यान जिल्ह्यातील मूल सावली, सिंदेवाही, कोरपना व वरोरा येथील शिक्षण संस्थेत सुद्धा हा गैरप्रकार झाला आहे त्याची उच्च स्तरीय चौकशी होणे अपेक्षित आहे
मनसे कडे अनेक शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नावे.,
शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या बोगस शिक्षक शिक्षकेत्तर भरती संदर्भात राज्यातील शिक्षण संस्थामध्ये रोज नवनवे खुलासे होतं असताना चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा याबाबत मनसे कडे अनेक शिक्षक संपर्क करून बोगस शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नावे देत आहे, यामध्ये चांदा शिक्षण प्रसारक मंडळ यासंह जवळपास 10 शिक्षण संस्थामधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे आली आहेत, या सर्व बोगस भरती ला स्वतः शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव दोषी असताना कारवाई मात्र मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर होतं असल्याने मनसे कडून प्रथमता संस्था चालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होतं आहे.
राज्य शासनाकडून नव्याने एसआयटी समिती.
सध्या शालार्थ आयडीच्या घोटाळ्याने संपुर्ण शालेय शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून त्या घोटाळ्याबाबत विविध लोकप्रतिनिधी, संघटना व तक्रारदार नागरिक यांचेकडून शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. राज्यात नागपूर, गोंदिया भंडारा, चंद्रपूर गडचिरोली सह नाशिक, जळगाव, बीड, लातूर, मुंबई या ठिकाणी असे गैरप्रकार आढळून आले आहे, त्यामुळे आता शासनाकडून विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात असून या पथकाचे प्रमुख म्हणुन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. तर शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हारुन आतार यांची सदस्य सचिव तर पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा यांची सदस्य म्हणुन नियुक्ती केली आहे. दरम्यान एसआयटीच्या कार्यकक्षाही ठरविण्यात आलेल्या आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता , शालार्थ मान्यता, सेवासातत्य, विना अनुदानीत वरुन अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल या समित्या मार्फत शासनास सादर केला जाणार आहे व सन २०१२ पासून आजपर्यंतच्या सर्व प्रकरणांची चौकशी होणार आहे.