Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर च्या नायब तहसीलदार यांनी पळालेल्या रेतीची हाफ टन गाडीला...

धक्कादायक :- चंद्रपूर च्या नायब तहसीलदार यांनी पळालेल्या रेतीची हाफ टन गाडीला पैसे घेऊन सोडले?

स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी नायब तहसीलदार तलाठी यांनी केले खिशे गरम? पटवारी योगेश सागुले ची हप्ता वसुली जोरात?

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यात रेती घाट जेमतेम सुरू असतांना काही रेती माफिया यांचा प्रशासनासोबत असलेला मासिक करार यामुळे रेती खुलेआम वाहतूक होतं असून चोरट्या मार्गाने शहरात मोठ्या प्रमाणात रेतीवाहतूक व रेतीची साठवणूक सुरू आहे, दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे आदल्या दिवशी शहरात बंदोबस्तात पोलीस प्रशासन असताना रयतवारी कॉलरी परिसरात नायब तहसीलदार यांनी एका हाफ टन गाडीला पकडले,. मात्र गाडी मालकाने पकडलेली रेतीची गाडी पळवली आणि गाडी मालकांनी नायब तहसीलदार यांचे सोबत बोलणी केली, बोलणी मध्ये नायब तहसीलदार आणि तलाठी हजर होते मात्र तलाठी यांच्याकडे हप्ता वसुली सुरू असल्याने त्यांनी मध्यस्ती करून मामला इथेच रफादफा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जी गाडी मुजोरी करून पळवली गेली ती तहसील कार्यालयात लागली नसल्याने याचा शोध घेतला असता त्याचं दिवशी नायब तहसीलदार यांनी तलाठी योगेश सागुले यांचे माध्यमातून पैसे घेऊन गाडी सोडल्याची विश्वसनीय माहिती असून या प्रकरणी सबळ पुरावे भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल प्रतिनिधी यांच्या हाती आले आहे.

चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी परिसरात जागोजागी रेती चे मोठे स्टॉक असून रेती त्या रेती स्टॉक मधून रेतीची चिल्लर विक्री होतं असतें, मात्र याकडे तहसील प्रशासनाचे पूर्णतः अर्थपूर्ण दुर्लक्ष असून दिनांक 14 ऑगस्ट ला जो हाफ टन रेतीची गाडी पकडल्या गेली ती सिसिटीव्ही मध्ये आली असून त्यांचे विज्युअल सुद्धा समोर येत आहे दरम्यान नायब तहसीलदार यांनी पैसे घेऊन रेती गाडीवर कारवाई केली नसल्याने नायब तहसीलदार व तलाठी प्रसारमाध्यमाच्या रडारवर आले आहे, आता जेंव्हा कुंपणच शेत खात असेल तर शेताला वाचविणार कोण हा गंभीर प्रश्न असून या दोघांवार विभागीय चौकशी लावून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here