शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांची शिवसेना महिला आमदार मनीषा कायंदे यांच्यासाह पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी.
चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरातील अंत्यसंस्कार करणाऱ्या शांती धाम संस्थेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने गेल्या 25 वर्षापासून लाकडी टॉल चालविणाऱ्या नरेंद्र गर्गेलवार व त्यांनंतर त्यांची मुलगी स्नेहा गर्गेलवार हिने लाकडाचा टॉल चालवीत असताना मुलीवर वाईट नजर ठेऊन तिचे लाकडाचे टॉल हटविण्यासाठी तीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संस्थेचे कर्मचारी हरीश गाडे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा अशी मागणी जिल्हा प्रमुख बंडू हजारें यांनी शिवसेना महिला आमदार मनीषा कायंदे यांच्यासाह चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे, दरम्यान काही दिवसापूर्वी मनसे पदाधिकारी यांचेसोबत पत्रकार परिषद घेऊन स्नेहा गर्गेलवार हिने आपल्यावर काय काय अन्याय आत्याचार होतोय याचा पाढा वाचला होता, त्यामुळे शांतीधाम संस्थेत आत मोठा धमाका होईल अशी परिस्थिती दिसत आहे.
चंद्रपूर शहरातील मागील सन 1996 पासून कार्यरत शांती धाम संस्था ज्या माध्यमातून मृतकांचे अंत्यसंस्कार राहमतनगर ईराई नदी घाटावर केल्या जाते, तिथे आपल्या वडिलांपासून (नरेंद्र गर्गलवार) सन 2001 पासून अंत्यसंस्कार करिता लाकडं पुरविण्यासाठी लाकडाचा टॉल चालविणाऱ्या नेहा गर्गेलवार या मुलीला स्वतःला माजी सैनिक म्हणविणारा संस्थेचा कर्मचारी हरीश गाडे वाईट नजर ठेऊन तीला त्रास देत आहे, तिचे वडिलांपासून लाकडाचे टॉल शांती धाम संस्थेत करारानुसार किरायाने सुरू आहे. दरम्यान ते हटविण्याचे कारस्थान हरीश गोडे करत असताना त्या मानसिक त्रासामुळे नरेंद्र गर्गलवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने 28/11/2024 रोजी मृत्यू झाला होता, आता जगण्याचे कुठलेही साधन नसल्यामुळे पिडीत मुलीने स्वतः लाकडाचा टॉल सुरू केला, मात्र हरीश गाडेवर प्रशिक्षनार्थी मुलींना त्रास देत असल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेधन मध्ये दाखल आहे, त्याने स्वभावानुसार मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आपली वाईट नजर टाकली, पण मुलीने आपल्या वडिलांचा व्यवसाय संघर्ष करून चालवला असताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. वासलवार व सचिव घनशामसिहं दरबार यांना हाताशी धरून हरीश गोडे यांनी मुलीला त्रास देणे सुरू केले आणि लाकडाच्या धंद्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला लाकडाचा टॉल मिळवून दिले, परंतु ज्याअर्थी नरेंद्र गर्गलवार यांच्यासोबत झालेला संस्थेचा करार याबाबत न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना व संस्थेने मुलीला काम बंद करण्याचे पत्र दिले त्यावर न्यायालयात स्थगिती असताना संस्थेकडून न्यायालयाचा सुद्धा अवमान करून जी दादागिरी सुरू आहे ती दादागिरी शिवसेना खपवून घेणार नाही त्यामुळे हरीश गाडे व संस्था संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागाणी बंडू हजारें यांनी केली आहे.
स्नेहा गर्गलवार ही मुलगी वडिलांचा व्यवसाय स्वतः चालवून एक प्रकारे समाजात आदर्श निर्माण करत आहे, कारण जर मजूर नसले तर स्वतःचं लाकडं सरणापर्यंत पोहचवीत असते, जर प्रेत उशिरा आले तर ती स्वतः उभी राहून मजुराकडून काम करून घेत असतें, पण मुलगी आपल्या मताप्रमाने वागत नाही म्हणून तिच्याकडून लाकडाचा टॉल काढून घेण्यासाठी हरीश गाडे कटकारस्थान करून रामनगर पोलिसांत खोट्या तक्रारी देऊन मुलीला नाहक त्रास देत आहे, दरम्यान मुलीने तक्रार दिली तर ती घेतल्या जात नाही मात्र मुलीने स्वतःवर पेट्रोल टाकून मरण्याची धमकी दिली, तुम्हांला फसवतो म्हणून म्हटलं असा कलोकल्पित आरोप करून रामनगर पोलीस स्टेशन मध्ये काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे, शिवाय त्या मुलीकडे लाकडं सरणावर टाकण्याचे काम करणाऱ्या तिच्या मजुरांना पोलीस स्टेशन मध्ये नेतो, पोलिसाकडून मारायला लावतो अशा धमक्या हरीश गाडे देतो, त्यामुळे एका मुलीला अशा प्रकारे प्रताडीत करणे म्हणजे महिला अत्त्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा आहे तो गुन्हा हरीश गाडे यांचेसह त्यांचे साथीदार चिराग मामीडावर, अविनाश मुंगले व ज्याच्या नावाने बेकायदेशीर टॉल संस्थेकडून दिला गेला त्या जितेंद्र तायडे याचेवर दाखल करावा अन्यथा शिवसेना संस्थेच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारें यांनी निवेदनातून दिला आहे.