शिक्षक भरती घोटाळ्यात सामील चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण साम्राटांची एसआयटी कडून कधी होणार चौकशी?
शिक्षणाच्या आईचा घो भाग:-1
संपूर्ण महाराष्ट्रात शालांत आयडी व बोगस शिक्षक भरती घोटाळा गाजत असतांना केवळ नागपूर च्या सध्या शैक्षणिक संस्था रडारवर आहेत आणि जवळपास एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीय आहे, सायबर पोलिसांनी तपासलेल्या 1 हजार 80 पैकी 680 शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलं आहे, त्यामुळे सर्वच बोगस शिक्षकांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारने दिलेत. अगोदरचं सरकारी शाळा बंद होतं आहे आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या मराठी शाळा बंद होऊन इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांचा बाजार भरत आहे, गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात चाललेल्या या प्रकाराची गंभीर स्थिती बंघता महेश मांजरेकर दिग्दर्शित २०१० सालच्या “शिक्षणाचा आईचा घो.” या चित्रपटाची आठवण येते, हा चित्रपट शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार आणि त्यातील पैसा कमावण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करतो, जिथे शिक्षण हे फक्त पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी वापरले जाते. हा चित्रपट शिक्षणाच्या वाढत्या व्यवसायीकरणावर आणि पैशाला दिले जाणाऱ्या महत्त्वावर केंद्रित आहे. शिक्षण कसे केवळ पैसा मिळवण्याचे एक साधन बनले आहे, शिक्षणाच्या गैरप्रकारांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. थोडक्यात “शिक्षणाच्या आईचा घो” हा चित्रपट शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक परिणामांवर एक भाष्य आहे. मात्र आता त्या चित्रपटात पुन्हा एक नवा अध्याय जोडला जाईल अशी शिक्षण क्षेत्रात मोठी घडामोड होऊन शिक्षकांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, अर्थात जो शिक्षक शिक्षणाचं अमूल्य असं कार्य करतो तोच जर बोगस असेल तर शिक्षण सुद्धा बोगस झालंय कां? हा प्रश्न उपस्थित होतं आहे.
नागपूर मध्ये एसआयटी चौकशीत निष्पन्न झालेल्या व बोगस शालार्थ आयडी बनवलेल्या शिक्षकांना अटक करण्याचे संकेत दिले असले तरी हा घोटाळा कसा उघड झाला? त्याची मोडस ऑपरेंडीच एका टीव्ही न्यूज चैनेल ने उघडं केली आहे, नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या समितीने 233 शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचा अहवाल दिला होता, त्याआधारेच 12 मार्च 2025 ला सायबर पोलिसांकडे पहिला गुन्हा दाखल झाला आणि चौकशीचं चक्रं फिरायला सुरुवात झाली, या प्रकरणात एसआयटीने निलेश वाघमारेला अटक केलीय, आणि एसआयटीने आणखी चौकशी केली, यात सायबर पोलिसांनी 1 हजार 80 शालार्थ आयडींची तपासणी केली, त्यापैकी तब्बल 680 शालार्थ आयडी बोगस असल्याचं आढळून आलंय, या प्रकरणी आतापर्यंत शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय, मात्र माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे अजूनही फरार आहे…
हा घोटाळा फक्त नागपूर पुरता मर्यादित नाही तर या घोटाळ्यानं अख्ख्या महाराष्ट्राला पोखरलंय, त्यामुळे फक्त 1 हजार 80 शालार्थ आयडीपैकी 680 बोगस आयडी नागपूर ला आढळले असतील तर राज्यभरात शालार्थ आयडीच्या माध्यमातून किती बोगस शिक्षक असतील? याची कल्पनाच न केलेली बरी, खरं तर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे त्यामुळे ज्या अर्थी त्यांना एसआयटी चौकशी पथकाने अटक केली तेंव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील काही शिक्षण साम्राट हे यात गुंतले असल्याची पुष्टी होतं आहे. त्यामुळे जर नागपूर मध्ये 680 शिक्षक बोगस आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मोठी संख्या असणारं आहे आणि त्याचा शोध घेणे सुरू असून तो लवकरच पुढे येईल असे संकेत मिळतं आहे,