कांग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या राजेंद्र डोंगे यांना बनवलं सभापती, ज्ञानेश्वर डुकरे यांची रवींद्र शिंदे विरोधात तक्रार गुन्हे दाखल..
भद्रावती (प्रतिनिधी ):-
भद्रावती बाजार समितीच्या आज झालेल्या सभापती निवडणुकीत मोठा ट्वीस्ट दिसला असून बाजार समितीत ज्यांनी सत्ता आणली त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी माजी सभापती भास्कर ताजने यांच्यावर शाब्दिक बाचबाची झाल्यानंतर चिडलेल्या सभापती पदाचे उमेदवार ज्ञानेश्वर डुकरे यांनी भयंकर चीड आल्यानंतर रवींद्र शिंदे यांना लाथ मारल्याची खळबळजनक चर्चा असून निवड झालेले सभापती राजेंद्र डोंगे यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तू माझे दोन मत फोडले हा प्रश्न करून चावताळलेल्या रवींद्र शिंदे यांनी माजी सभापती भास्कर ताजने यांचेवर राग व्यक्त करत असतांना त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर डुकरे यांनी आपल्याला शब्द देऊन सुद्धा गद्दारी केली हा वचपा काढला त्यामुळे रवींद्र शिंदे यांनी स्वतःवरचं संकट ओढवून घेतलं असल्याची चर्चा भद्रावती शहरात आहे, कारण पहिल्यांदा शिंदे परिवारावर कुणी अटॅक केला ते ज्ञानेश्वर डुकरे हे मागील 20 वर्षांपासून शिंदे परिवाराशी जुळले होते त्यामुळे त्यांच्याकडून हा अटॅक होने म्हणजे हे गंभीर प्रकरण असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
भद्रावती बाजार समिती निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली होती त्यात शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार मनोहर आगलावे, गजानन उताने, विनोद घुगुल, शरद जांभूळकर, ज्ञानेश्वर डुकरे, भास्कर ताजने, कान्होबा तिखट, आश्लेषा जिवतोडे, शांता रासेकर, परमेश्वर ताजने, शामदेव कापटे, अविरोध आलेले मोहन भुक्या. काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनल राजेंद्र डोंगे, प्रविण बांदूरकर, अतुल जीवतोडे, भानुदास गायकवाड, अनिल चौधरी, राजू आसुटकर विजयी झाले होते, या निवडणुकीत रवींद्र शिंदे गटाकडे 18 पैकी 12 उमेदवार निवडून आले तर कांग्रेस प्रणित शेतकरी विकास पेनेल कडे 6 उमेदवार निवडून आले त्यामुळे रवींद्र शिंदे गटाचे भास्कर ताजने यांना बाजार समिती चे सभापती करण्यात आले, पण रवींद्र शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेत अध्यक्ष पदासाठी भाजप मध्ये प्रवेश केल्याने त्यांनी सगळे संचालक भाजप मध्ये आणले पण त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर डुकरे यांना सभापती पदाची ऑफर दिली पण त्यांना सभापती पद दिले नसल्याने डुकरे यांनी जो रवींद्र शिंदे यांच्यावर अटॅक केला तो राजकीय क्षेत्रात क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सिडीसीसी बैंक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल?
भद्रावती बाजार समिती मध्ये संचालक ज्ञानेश्वर राजाराम डूकरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये सिडीसीसी बैंकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली असून त्या तक्रारी मध्ये नमूद केले ते खालील प्रकारे आहे, त्यांनी नमूद केले की पोलीस स्टेशन भद्रावती येथे सोबत भास्कर लटारी ताजने यांचेसह ये रिपोर्ट देतो की, मी वरील पत्यावर राहतो व शेती व्यवसाय तसेच माझा हार्डवेअरचे दुकान असून मी कषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती येथील संचालक पदावर सध्या भी कार्यरत आहे. आज दि. 03/09/2025 रॉजी कषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अध्यासी अधिकारी याचे आदेशान्वये सभापती पदासाठी निवडणुक असल्याने सभापती पदासाठी मी अर्ज केला होता. त्याकरीता मी फार्म भरण्याकरीता बाजार समिती कार्यालया मध्ये सकाळी 11/00या गेलो होतो. नंतर दुपारी 12/00 मतदान प्रक्रीया पूर्ण झाल्यावर दुपारी 1/00 वा सुमारास निकाल लागला असता माझी हार झाली त्यामुळे मी व माझे सहकारी भास्कर लटारी ताजणे मिळून कार्यालयाचे बाहेर रोडवर आलो व आम्ही आपसात चर्चा करीत असता तेथे रविंद्र श्रिनीवास शिंदे रा. भद्रावती हा रोडवर आला व माझे सोबत असलेल्या भास्कर लटारी ताजणे यांना शिवीगाळ केली तेव्हा आम्हाला कशाला शिवीगाळ करतो असे रविंद्र शिन्दे याला बोललो असता रविंद्र शिन्दे याने मला म्हटले की, तु माझे विरोधात का फार्म भरला असे म्हणून मला पण शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व माझे डावे गालावर दोन थापडा मारल्या त्यामुळे मी व माझा मित्र घाबरुन गेलो आहे. तरी भविष्यात त्याचे पासुन मला व माझे मित्राला धोका असल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा