उच्चस्तरीय चौकशी करून त्या कंत्राटदार व संबंधित सीएसटीपीएस अधिकारी यांचेवर कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचा इशारा..
चंद्रपूर:-
सीएसटीपीएस कंपनी मध्ये एस. व्ही. इंटरप्राईजेस ही कंपनी 2 ते 3 वर्षांपासून युनिट क्रमांक 2 व 3 मध्ये बेल्ट कन्वर्शन, प्लॅटफॉर्म जाळ्या लावणे, शेडडाऊन,डांपिंग प्लेट रिप्लेसमेंट इत्यादी कामे करत आहे, दरम्यान या कंपनी मध्ये काम करणाऱ्या कामगारांची नावे हजेरी बुकावर जी नोंदविण्यात आली त्यामध्ये मोठा घोळ असून मिळालेल्या दास्तावेज नुसार या कंपनी मध्ये एकूण 15 कामगार कर्मचारी काम करतात असे नमूद आहे, मात्र प्रत्यक्षात या कंपनी मध्ये केवळ 5 कामगारचं काम करत होते, त्याची नावे प्रणतोष हरिपद इजारदार, नितेश दामोधर दानव, रमेश आंनदराव भोंगरे, रामेश्वर सदाशिव खोब्रागडे, राजकुमार जुनघरे इत्यादी आहेत, मात्र सीएसटीपीएस प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत इतर 10 लोकं कोण आहेत, त्यांची नोंद ह्या रेकॉर्डवर का घेण्यात आले याची सखोल चौकशी करून त्या पाच कामगारांना कामावरून कमी केले त्यांना कामावर घ्यावे व कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी मुख्य अभियंता राजेंद्र राठोड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन घेण्यात येत आहे ही अतिशय गंभीर बाब असून अशा किती कंत्राटी कंपन्या आहेत ज्या कंत्राटी कंपनी मध्ये असे बोगस कामगारांना दाखवून कंपनीला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्या जातं आहे याची सखोल चौकशी करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी असून सीएसटीपीएस कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशिवाय हा घोळ होऊ शकत नाही त्यामुळे कमिशनखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यावर पण कारवाई करावी आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाधे, सुनील गुढे, पियुष धुपे, इत्यादीची उपस्थिती होती..