Home चंद्रपूर चिंताजनक :- शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्या तहसीलदार गौडचे रेती माफियांना अभयदान...

चिंताजनक :- शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्या तहसीलदार गौडचे रेती माफियांना अभयदान ?

वडा रेती घाटावरिल प्रकरणात रेती माफियावर पोलिस कारवाई करण्यास महसूल विभागाची टाळाटाळ ?

रेती चोरी प्रकरण भाग – ४

घूग्गूस नकोडा परिसरातील वडा घाट, चीचोली घाट .हल्ला घाट व नकोडा घाट हे रेती तस्करी चे अड्डे बनले आहे. मात्र या ठिकाणाहून रेती तस्करी करणाऱ्यांकडून जबरन वसुली करून महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी मालामाल झाले असल्याने त्यांची या रेती तस्करा विरोधात कारवाई करण्याची हिंमत होत नाही असेच एकूण चित्र दिसत आहे. वडा रेती घाट येथे दिनांक १९ जून ला झालेल्या घटनेत प्रिया झामरे या महिलेने रेती माफिया कडून पैसे घेतल्याने त्यांचे विरोधात रेती घाटावरिल व्हिडिओ दाखवून दिनांक २३ जून ला घूग्गूस पोलिस स्टेशन मधे एका हुसेन शेख नामक व्यक्तीने तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र त्याच व्हिडिओ मधे सर्व रेती माफिया स्पष्ट दिसत असताना त्या रेती माफियावर पोलिस कारवाई का करण्यात येत नाही ? हा गंभीर प्रश्न असून रेती घाटावर मोठ मोठे खड्डे रेती माफीयांनी करून कोट्यावधी रुपयाची रेती चोरी केल्याचे स्पष्ट दिसत आहे, त्या रेती घाटावरिल खड्डे मोजमाप करून किती कोटीची रेती चोरी झाली? ती कोणी केली ? याची चौकशी करून रेती तस्करावर गुन्हे दाखल करण्याचे सोडून तहसीलदार गौड व खनिकर्म अधिकारी हे गप्प झाले कसे ? याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून रेती माफियासोबत यांचे साटेलोटे असल्याशिवाय कोट्यावधी रुपयाची रेती चोरी करणाऱ्या रेती माफिया विरोधात महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी गप्प राहणार नाही हे स्पष्ट आहे. खरं तर ज्या प्रिया झामरे यांना अधिकारी समजून रेती माफीयांनी त्यांना आपले ट्रक्टर वाचविण्यासाठी सोबतच १ लाख १० हजार रुपयाचा दंड वाचविण्यासाठी हजारो रुपये दिले त्या प्रिया झामरे यांच्यावर गुन्हा होतो मग कायद्यानुसार जो लाच घेतो तो जसा गुन्हेगार आहे तसा लाच देणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असताना त्या लाच देणाऱ्या व रेती घाटावर व्हिडिओ काढणाऱ्या रेती तस्करावर गुन्हा दाखल का होत नाही ? हा मोठा प्रश्न आहे. मात्र गोपनीय माहितीनुसार खनिकर्म विभागाकडून त्या संदर्भात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू होत्या.पण वरिष्ठांकडून आदेश आला नसल्याने रेती माफियावर कारवाई झाली नाही पण जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे निश्चितच रेती माफियासह रेती चोरी प्रकरणात सामील तहसीलदार गौड व इतर मंडळ अधिकारी व पटवारी यांच्यावर कारवाई करणार ? अशी अपेक्षा आहे. आता नदीला पाणी आल्यानंतर रेती माफियानी जे खड्डे नदीत पाडले ते मोजणे आवश्यक आहे ते केव्हा मोजतील व त्यानंतर कूणकूणावर कारवाई करतील याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here