Home चंद्रपूर करंजी येथे सापडला 22 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह

करंजी येथे सापडला 22 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह

हैदराबाद येथून आगमनापासून होता विलगीकरनात :- प्रशासनाकडून संपूर्ण करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित

गोंडपिपरी – वेदांत मेहरकुळे

तालुक्यातील करंजी येथील एक 22 वर्षीय तरुण रोजगारासाठी तेलंगणातील हैदराबाद येथे गेला होता. लॉकडावून काळात गेल्या चार दिवसांपूर्वी परतल्यानंतर शासनाचे वतीने नोंद करून घेत त्याला गृह विलगीकरनात ठेवण्यात आले होते. काल उशिरा रात्री बारा वाजता स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील करंजी गावातील बहुतांश मजूर हे रोजगाराच्या शोधात बाहेर राज्यात गेले होते. त्यापैकीच एक असलेल्या 22 वर्षीय तरुण रोजगारासाठी हैदराबाद येथे गेला होता. मात्र वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोना या महाभयंकर रोगाचे पसरते जाळे पाहून संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली. यातच गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी तो युवक आपल्या मूळ गावी परतला तत्पूर्वी प्रशासनाने त्याची नोंद करून घेत त्याला गृह विलगीकरणात ठेवले. याच दरम्यान त्या युवकास कोरूना लक्षण जाणवत असल्याने त्या युवकांचे स्वाब नमुने पूर्वीच पाठविण्यात आले होते. अशातच काल उशिरा रात्री त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानेप्रशासनाच्या वतीने तातडीने त्याला चंद्रपूर कोविड सेंटर येथे हलविण्यात आले. तर आज सकाळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी तहसीलदार सीमा गजभिये, डॉ. दिनेश चकोले, डॉ. प्रशांत पेंदाम , ठाणेदार संदीप धोबे, तथा अन्य सहकारी कर्मचारी चमूने करंजी गाव गाठून कोरोना बाधित युवकाच्या वास्तव्य ठिकाणापासून काही अंतरावर चा भाग पूर्णता सील केला. मात्र प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या चौकशीत संबंधित कोरोना बाधित युवकाचा इतरत्रही संपर्क आला असावा अशा संशयावरून संपूर्ण करंजी गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. तत्पूर्वी श्वसनास ह त्या युवकास अन्य त्रास जाणवत असताना काही इसमांनी या युवकास उपचाराकरिता गोंडपिंपरी येथे उपचाराकरिता वाहनात घेऊन आल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेत प्रशासनाकडून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धडपड सुरू असल्याची माहिती आहे.

कोट –
परराज्यातून रेड झोन मधून परतलेल्या मजुरांना गृह विलगीकरनात ठेवण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरनात ठेवण्यात ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला असता तर आज करंजी गावाला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले नसते. सध्या शेती हंगाम सुरू असून करंजी गावात कोरूना बाधित रुग्ण सापडल्याने अनेक मजुरांचा रोजगार हिरावला असून या परिस्थितीस पूर्णता ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत फौजदारी गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
तूकेश पत्रुजी वानोडे
माजी तंमुस अध्यक्ष कथा ग्रा. प. सदस्य करंजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here