Home कोरपणा घरकूलाचे अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा,

घरकूलाचे अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा,

घरकुलाचे अनुदान तात्काळ द्या, तहसीलदारांना निवेदन !

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी:-

कोरपना:-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कोरपना येथे १४९ घरकुल मंजूर झाले आहे, व त्यापैकी अनेक लाभार्थ्यांनी बांधकाम सुद्धा सुरू झाले आहे,परन्तु अनेकांचे बांधकाम स्लाब लेवल होऊन सुध्दा चार ते पाच महिने लोटूनही लाभार्थ्यांच्या खात्यात बांधकामाचे अनुदान जमा झाले नाही, त्यामुळे पुढील बांधकाम कसे करायचे अशा प्रश्न लाभार्थ्यांना पडला असून बांधकाम अर्धवट पडले असल्याने पावसाळ्या दिवसात कसे राहायचे प्रश्न निर्माण झाला आहे, या करिता बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांना तात्काळ दुसऱ्या टप्प्यातील अनुदान देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा घरकुल लाभार्थ्यांनी दिला असून त्या बाबतचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे,
प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत ज्यांना सिमेंट विटांचे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले आहे, अगोदर लाभार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने बांधकाम केल्या नंतर पहिल्या टप्प्यातील ४० हजाराचे अनुदान मिळाले आहे,त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अनुदान देण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने घरकुलाचे बांधकाम ठप्प पडले आहे ,दुसऱ्या टप्यातील बिल लाभार्थ्यांनी
सादर करून चार ते पाच महिन्यांच्या कालावधी लोटला परन्तु अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही,त्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखळले आहे,

या करिता घरकुलाचे अनुदान तत्काळ देण्यात यावे व घरकुल बांधकाम करिता महसूल विभागाने रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून अनुदान न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे,यावेळी नगरसेवक अमोल आसेकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारत चन्ने व घरकुल लाभार्थी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here