Home चंद्रपूर दखलपात्र :- लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर काढणाऱ्या पत्नीला तीन तलाक च्या नावावर...

दखलपात्र :- लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर काढणाऱ्या पत्नीला तीन तलाक च्या नावावर सोडचिठ्ठी 

पती जामीन यांच्यावर वरोरा येथे गुन्हा दाखल विदर्भात प्रथमच नजमा जामीन अली यांच्या तक्रारी वरून तीन तलाक चा पहिला गुन्हा वरोरा पोलिस स्टेशन मधे दाखल झाल्याने खळबळ. पती जामीन अली यांच्याविरुद्ध मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा. 

चंद्रपूर :-

मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पणे तलाक तलाक तलाक हे शब्द उच्यारुन पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची प्रथा होती मात्र मागील 2019 मधे मुस्लिम महिला विवाह सरक्षण कायद्यांतर्गत आता नव्यानेच मुस्लिम समाजात तीन तलाक ह्या धार्मिक मुद्याला फाटा देत नवा कायदा अस्तित्वात आला असून या कायद्यांतर्गत वरोरा पोलीस स्टेशनयेथे गुन्हा दाखल झाल्याने मुस्लिम समाजात खळबळ उडाली आहे.

नजमा हिने जामीन अली या व्यक्ती सोबत दिनांक 12/02/2015 रोजी मुस्लीम रीतीरिवाजानुसार पार पडला होते. लग्नानंतर नजमाला जामीन अली पासुन दोन अपत्य मुली जन्माला आल्या, त्यात मोठी मुलगी मरियम वय ३ वर्ष असुन लहान मुलगी रुबी वय १ वर्ष आहे. लनापासुनच नजमाचे पती व सासरचे तिला हुंड्यासाठी त्रास देत होते, तिन तोळे सोने माहेरून आणावे म्हणुन तिचेवर दबाव टाकुण नेहमी मारझोड करीत होते. यामधे नजमा चा दिर शाहबाज अली तिचेवर वाईट नजर टाकत होता. त्याबद्दल सुद्धा नजमा ने स्वतःच्या पतीला बोलली असता ते तिलाच मारझोड करुन त्रास देत होते. त्यामुळे ती वारवार त्याच्यासोबत बोलुन पतीची समजुत घालन्याचा प्रयत्न करीत आली. कारण तिला त्याच्यासोबत लहान मुलीना असल्याने संसार करने गरजेचे होते. परंतु ती जानेवारी 2020 ला तव्येत खराब झाल्याने माहेरी आली त्यानंतर मार्च 2020 तिच्या सासरी नादावयास म्हणुन दोन्ही मुलीना घेवुन गेली तेव्हा तिच्या पतीने तिला धरी येवु दिले नाही आणी तिला लाथा बुक्यानी मारहान केली आणी घरुन हाकलुन दिले. हाकलुन लावले त्यामुळे ती तिच्या लग्नानाचे मध्यस्त ताहीर अली रा. पुसद जिल्हा, यवतमाळ याच्या कडे काही दिवस मुलीसह राहीली त्यादरम्यान सुध्दा ती वारंवार तिच्या सासरच्या लोकांना घरी नादावयास येवु द्या म्हणुन विनंती करत राहीली. परंतु त्यानी तिला घरी येवु दिले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तिने तिचे काका अनवर अली सोबत वरोरा येथे परत आली. परंतु वरोरा येण्या पुर्वी नजमाच्या सासु फरीदा असलम अल्ली हिने तिची मोठी मुलगी गरीयम हिला जबरदस्ती तिच्या हातुन हिसकवुन घेतली व तिला काही दिवस ठेवुन परत पाठवुन देन्याचे आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत मरीयमला पाठविले किंव्हा आनुन दिले नाही. नजमाचा पती तेव्हापासुन तिचेवर तलाक देन्याचा दबाव टाकत होता . ते मरीयमला परत आणुन देतो तु मला तलाख दे असे म्हणत होते , परंतु तिला दोन मुली असल्याने ती त्याच्या भविष्याचा विचार करुन तलाक दयायला तयार नसल्यामुळे ते मरीयमला कधिच तुला देणार नाही असे म्हणत होते. दरम्यान तिच्या पतीने पोस्टाच्या लिफ़ाफ्यात 100 रु च्या स्टॅम पेपरवर तिचे पती जामीन ईरानी यानी तिला तलाख नामा लिहुन पाठविले त्यां तलाखनाम्याचा मजकुरा मुळे तिला मानशीक व शारीरीक आघात झाला आहे. पतीने तिला तलाकनामा पाठविला या आघाताला ती सहन करु शकत नाही. त्या तलाकनाम्यात १) शराफत लियाकत अल्लिरा २) भोलु अशफाक अल्ली ३) अफसर मनसुर अली याने साक्षदार म्हणुन सही केली आहे. त्या तलाकनाम्यासोबत एक तसदिक नामा सुद्धा मौलानाच्या सहीने जोडला आहे . सोबतच अँड ए.ए. खान यांचे पहिला तलाक दिल्याबद्दल नोटिस सुद्धा जोडले होते ज्यामुळे नजमा ला मानसीक व शारीरीक पतीने देवून तिच्या गैरहजेरीत आणी संमतीशिवाय एकतर्फ तलाकनामा तिला पाठवल्याने वरोरा पोलिस स्टेशन येथे लेखी रिपोर्ट दिली असता विदर्भात पहिलाच मुस्लिम महिला विवाह सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात समजसेविका जबिन दोसाणी यांनी महिलेला न्याय मिळवून देण्यास प्रयत्न केले व चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेवून आरोपी वर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी केली या प्रसंगी मुलीचे वडील सरताज अली, आई फरीदा सरताज अली व काका अन्वर अली उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here