Home कोरपणा धक्कादायक :- प्रतिबंधक क्षेत्रातील सत्ताधारी नगरसेवक पाप्पया ठिय्या आंदोलनात ?

धक्कादायक :- प्रतिबंधक क्षेत्रातील सत्ताधारी नगरसेवक पाप्पया ठिय्या आंदोलनात ?

मुख्याधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व पक्षपात आला समोर ! भाजप नेते शिवाजी सेलोकर यांचा आरोप !

गडचांदूर :-

राज्यात कोरोनाचा प्रसार जोमात वाढत असल्याने शासनाने काही नियम कडक करून त्यावर अमलबजावणी करण्यास स्थानिक प्रशासनाला बाध्य केले आहे हे नियम शासन प्रशासन /लोप्रतिनिधीनी राबवायचे आहे. परंतु गडचांदूर येथील सत्ताधारी स्वीकृत नगरसेवक पाप्पया हे चक्क प्रतिबंधित क्षेत्रात असताना केंद्र शासनाविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असताना सुद्धा मुख्याधिकारी यानी त्यांचेवर कारवाई केली नाही तर उलट त्यांची मुख्याधिकारीच पाठराखण करीत असल्याचा आरोप गडचांदुर येथील शिवाजी सेलोकर भाजपा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष यांनी केला आहे.
गडचांदूर शहरात आजपर्यंत केवळ तीन रुग्ण कोरोना बाधित आढळले. नगर परिषद गडचांदूरच्या प्रशासनाकडून शहरात मास्क न वापरनाऱ्या ना, दुकान वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू असल्यास दंड ,मास्क व सैनिटाईझर चा वापर न करणाऱ्या फळविक्रेताला दंड , कुठल्याही ठिकाणी जमाव असल्यास त्या ठिकाणी न प चे कर्मचारी जाऊन दंड ठोकण्याचे उत्तम काम चालू असताना प्रभाग क्र ३ वॉर्ड न ५ मध्ये दि २८ /६/२०२० ला दुसरा रुग्ण आढळला त्याच वेळेस खबरदारी म्हणून तो परिसर पूर्णतः बंद करण्यात आला.व तो परिसर उपविभागीय अधिकारी यांनी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले. त्यामुळे त्या परिसरातील कुणीही नागरिक बाहेर निघण्यास मनाई करण्यात आले असताना सत्ताधारी स्वीकृत नगरसेवक पपय्याजी पोनमवार हे प्रतिबंधित क्षेत्रात येत असताना सुद्धा दि २९/६/२०२० ला केंद्र शासनाचे विरोधात झालेल्या ठिय्या आंदोलनात सामील झाले, सदरचे आंदोलन हे अगदी नगर परिषद च्या समोरच असताना याची कल्पना मुख्याधिकारी यांना होती तरीही कुठलीही कार्यवाई न करता त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर त्याच भागात अरुण निमजे व सौ कल्पना निमजे (नगरसेविका) कुटुंबासह राहत असून अरुण निमजे सुद्धा प्रतिबंधक क्षेत्राचे नियमाचे उल्लंघन करून शहरातील अंत्यविधी व इतर कार्यक्रमात खुलेआम हजेरी लावित आहे. व दि २/७/२०२० ला परिवारासह ई-पास घेऊन वर्धेला गेले असल्याची चर्चा आहे.ते प्रतिबंधक क्षेत्रात असताना त्यांना ई-पास काढून गेल्याचे समजते.तर त्यांना ई-पास दिला कसा ? की नगरसेवकांना कायद्यात विशेष सूट आहे की काय ? याची सुद्धा चर्चा शहरात जोमाने चालू आहे. नगर परिषदचे कर्मचारी २४ तास कार्यात असताना त्यांनी माहिती दिली असावीच परंतु त्यांचे वर कार्यवाई का नाही ? असा सवालही शिवाजी शेलोकर यांनी केला आहे.आता खरोखरच मुख्याधिकारी त्यांचे विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करतील की पुनः जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Previous articleचंद्रपूर कोरोना अपडेट:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १३३ वर. 
Next articleदखलपात्र :- लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर काढणाऱ्या पत्नीला तीन तलाक च्या नावावर सोडचिठ्ठी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here