Home भद्रावती सनसनिखेज:- भद्रावती पोलिस स्टेशन मधे चक्क पोलिस महानिरीक्षका समोर भीमराव पडोळेची तक्रार.

सनसनिखेज:- भद्रावती पोलिस स्टेशन मधे चक्क पोलिस महानिरीक्षका समोर भीमराव पडोळेची तक्रार.

तरीही भीमराव गोपनीय विभागात कसा ? आणि गोपनीय विभागात असताना अवैध दारू सट्टापट्टी, सुगंधी तंबाखू विक्रेते यांच्याकडून वसुली करतो कसा ?

भद्रावती प्रतिनिधी :-

साला एक मछर आदमीको हिजडा बना देता है” हा एका चित्रपटाचा डायलॉग खरं तर सर्वाना माहीतच आहे, त्याचा अर्थ एखादा किडा जर एखाद्या वस्तूला लागला  की ती वस्तूच सडवुण टाकते अगदी असाच प्रकार भद्रावती पोलिस स्टेशन मधे घडत असून गोपनीय विभागात कार्यरत भीमराव पडोळे यांनी भद्रावती पोलिस स्टेशन ची दोनशे पाचशे रुपये पोलिस वेरिफिकेशन च्या नावावर घेऊन इज्जत वेशीवर टांगली आहे. आता तर त्यांनी गोपनीय विभागा सोबतच इतर अवैध कामात सुद्धा आपली वसुली मोहीम राबवून जणू या पोलिस स्टेशन चे आपणच ठाणेदार अशी किमया साधली आहे. महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षी पोलिस प्रशासन आणि जनतेत समन्वय साधण्यासाठी झालेल्या पोलिस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीत पोलिस स्टेशन मधील चर्चेत एका सामजिक कार्यकर्त्यांनी चक्क पोलिस वेरिफिकेशन करिता पोलिस दोनशे तीनशे पाचशे रुपये मागतात असा आरोप करून भीमराव पडोळे यांची जणू तक्रार दिली होती पण चपळ धूर्त आणि तेवढाच सेट्टिंगबाज भीमराव पडोळे यांनी वरिष्ठांचे हातपाय जोडून आपली इभ्रत वाचवली खरी पण पोलिस महा निरीक्षक यांनी अशा पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पकडून द्या असा सल्लाही दिला होता हे विशेष. यावेळी पोलिस अधीक्षक मौहेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे हे सुद्धा उपस्थित होते. या घटनेचा विडिओ च समोर आला असून तरीही मागील पाच वर्षापासून भीमराव पडोळे इथेच कसा ? हा प्रश्न पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे भद्रावती पोलिस स्टेशन मधे भीमराव पडोळे यांच्यामुळे जणू व्यवस्थेला कीड लागली असल्याचे बोलल्या जात आहे. मिळालेल्या चर्चेतील माहिती नुसार काही दिवसापूर्वी भीमराव पडोळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार झाली होती पण थोडक्यात ते वाचवले असल्याचे पण बोलल्या जात आहे. अशा पोलिस कर्मचाऱ्यांवर वेळीच पायबंद घातल्या गेले नाही तर पोलिस स्टेशन ची बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही सोबतच ठाणेदार यांच्या भूमिकेवर सुद्धा शंका घेतल्या जाईल, अर्थात आता पोलिस हायकमान कुठली कारवाई भीमराव पडोळे यांच्यावर करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here