घूग्गूस पोलिस स्टेशन मधील बदली प्रकरणात सर्वांचे विनंती अर्ज फेटाळून वानकर व बोरकर यांना सूट ?
घूग्गूस प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी असला तरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची मोठी तस्करी ही घूग्गूस मार्गे होत आहे. विशेष म्हणजे घूग्गूस पोलिस स्टेशन मधे जे जुने पोलिस कर्मचारी आहेत त्यांचा ह्या दारू तस्करांना मोठा पाठिंबा असून दारू तस्करांच्या वाढदिवसाला यांची हजेरी नेहमीच असते, यामधे घूग्गूस पोलिस मधे विनोद वानकर व सचिन बोरकर ही जोडगोळी म्हणजे दारू तस्करांना मार्गदर्शन करणारी, वेळोवेळी रात्रीच्या वेळेस दिशा दाखवणारी व अवैध दारूच्या धंद्यात कमिशन खाणारी डी बी स्कॉड ची बी टीम आहे असे म्हटल्या जाते.
जिल्हा पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्याकडून पोलिसांच्या बदल्या संदर्भात जी लिस्ट तयार झाली त्यात त्या वानकर व बोरकर या दोघांचे नाव समाविष्ट असल्याने आता त्या दारू तस्कर मित्रांची गोची झाली, त्यात घूग्गूस पोलिस स्टेशन मधील तब्बल १५ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली झाली होती मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयातून ज्यांना आपली बदली रद्द करायची आहे त्यांनी लेखी अर्ज करावा असे सुचविण्यात आले होते. पण त्यात अट अशी होती की ज्यांचे पती पत्नी समायोजन आहे, ज्यांची प्रक्रुती बरी नाही, ज्यांचे दोन वर्ष सेवानिवृत्त व्हायला आहे व ज्यांचे कौटुंबिक प्रश्न आहे त्यांनाच अर्ज करायचा होता मात्र आम्हांला एक वर्ष वाढवून द्या म्हणून घूग्गूस पोलिस स्टेशन मधील तब्बल १५ पोलिस कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज केला पण कुणाचीही विनंती मान्य करण्यात आली नाही पण आश्चर्याची बाब म्हणजे विनोद वानकर व सचिन बोरकर यांना घूग्गूस मधे पाच वर्ष झाल्यानंतर व त्यांच्यावर दारू तस्करा सोबत सबंध असल्याचा ठपका असताना सोबतच दारू व्यवसायात त्या दोघांची भागीदारी असल्याची चर्चा असताना त्यांची बदली थांबली कशी ? हा चर्चेचा मोठा विषय आहे, घूग्गूस मधे तर अशी पण चर्चा आहे की ह्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली रोखण्यात दादांनी मोठी राजकीय खेळी केली, पण मग जर ह्या दारू तस्करांना साथ देणाऱ्या वानकर व बोरकर यांची बदली रोखल्या जाते तर मग बाकी कर्मचाऱ्यांच्या बदल्या का रोखल्या जात नाही ? असा प्रश्न बदल्या झालेले पोलिस कर्मचारी करीत असल्याने दोघांची बदली रोखण्याचे रहस्य काय ? हे समजायला मार्ग नसून वानकर आणि बोरकर यांची रोखलेली बदली पुन्हा करण्यात यावी अशी मागणी होत आहे.