Home वरोरा संतापजनक :- प्रशासनाच्या चुकीमुळे आरोग्य कंत्राटी कामगारांवर उपासमारीची पाळी

संतापजनक :- प्रशासनाच्या चुकीमुळे आरोग्य कंत्राटी कामगारांवर उपासमारीची पाळी

 

सुरक्षारक्षक कामगारांचे थकीत वेतन द्या, पालक मंत्री ना. वडेट्टीवार यांच्याकडे छोटूभाई यांचे निवेदन,

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मागील अनेक वर्षापासून सुरक्षारक्षक कामगार सेवा देण्याचे काम करीत असून कोरोना महामारीमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या बरोबर हे सुरक्षा रक्षक रुग्णालयात सर्व कामे करीत असून या सुरक्षारक्षक कामगारांना मागील ७ ते ८ महिन्यापासून प्रलंबित हक्काचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षक कामगारांना महाराष्ट्र शासन सुरक्षा मंडळ व आरोग्य प्रशासन यांनी तात्काळ वेतन देण्याचे निर्देश मंत्रिमहोदयांनी द्यावे व मागील १ वर्षापासून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये मोफत सेवा देणाऱ्या १० सुरक्षारक्षक कामगारांचे प्रस्ताव सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी मुख्य कामगार आयुक्त मुंबई यांच्याकडे विशेष बाब म्हणून मान्यतेकरीता पाठवले आहे ते एक वर्ष लोटून सुद्धा आतापर्यंत आले नसल्याने या सर्व कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे, याला जबाबदार कामगार प्रशासन असून तात्काळ सदर प्रस्तावाला मान्यता देऊन यापूर्वी सेवेत असलेल्या कामगारांना सेवेमध्ये समायोजन करण्यात यावे याकरिता चर्चा करून राज्याचे पुनर्वसन मदत कार्य, बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दि.११. ऑगस्टला निवेदन सादर करण्यात आले, यावेळी निवेदन देताना काँग्रेस असंघटित कामगार वि जिल्हाध्यक्ष तथ.वरोरा सार्वजनिक बांधकाम सभापती. छोटू भाई शेख डॉक्टर हेमंत खापणे. मेहबूब भाई कमलेश बांबोडे होते. यावेळी मंत्रीमहोदयांनी सुरक्षारक्षक यांना वेतन देण्याकरिता लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना पाठवण्यात आली सर्व कामगारांना लवकर वेतन न मिळाल्यास दोन्ही जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय सुरक्षारक्षक कामगारांना सोबत घेऊन काम बंद आंदोलन छेडण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असा इशारा सुद्धा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here