Home भद्रावती अत्यंत दुर्दैवी :- भद्रावती येथील सुमठाणा जवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यु...

अत्यंत दुर्दैवी :- भद्रावती येथील सुमठाणा जवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यु तर एक गंभीर.

सोयरिक संबंध जुळवण्यासाठी जाणाऱ्या दोन चाकी गाडीला स्कॉर्पिओ ची जोरदार धडक.

भद्रावती प्रतिनिधी :-

वरोरा येथून चंद्रपूर ला सोयरिक संबंध जुळवण्यासाठी निघालेल्या वरोरा तालुक्यातील खरवड गावातील कार्तिक मोहुर्ले यांच्या दोन चाकी गाडीला भरधाव वेगाने मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ या गाडीची समोर चा तयार फुटल्याने जोरदार धडक बसली या धडकेत मागे बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला तर कार्तिक ला चंद्रपूर च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.या दुर्दैवी घतनेने परिसरात शोक व्यक्त होतं आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की म्रुतक व्यक्तीच्या डोक्यातून रक्ताचा जणू पूर आला होता दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचुन त्यांनी गंभीर जखमी असलेल्या कार्तिक ला चंद्रपूर ला पाठवले तर म्रुतक व्यक्तीचे शव भद्रावती च्या रुग्णालयात शवविच्छेदन ग्रुहात पाठवले. या प्रकरणी स्कॉर्पिओ चालक यांची चौकशी भद्रावती पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार व त्यांचे सहकारी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here