Home चंद्रपूर दिन विशेष :- ओबीसी नेते डॉ. जिवतोडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात संविधान दिन...

दिन विशेष :- ओबीसी नेते डॉ. जिवतोडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात संविधान दिन साजरा.

चिमूर, आमडी येथे संविधान दिन तर बोथली चिमूर येथे महात्मा फुले पुण्यतिथी निमित्य अभिवादन.

चिमूर प्रतिनिधी :-

भारतात सध्या ज्या प्रकारे कायदा पायदळी तुडवून सर्वसामान्य जनतेचे हक्क अधिकार हिरावल्या जातं आहे ते पाहता पुन्हा या देशात गरीब शोषित पिडीत जनतेला न्याय हक्क मिळवून देणाऱ्या आपल्या संविधानाला अधिक बळकट करणे काळाची गरज असल्याने संविधान दिनी एक संकल्प करण्याचा दिवस म्हणून आपण हा संविधान दिन साजरा करू या असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवाना केले होते त्यांच्या आवाहनाला हों देत चिमूर आमडी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. तर महात्मा फुले पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले.

यावेळी संविधान दिनी एस. आर. खोब्रागडे. यु.एन. नवहाते, प्रकाश झाडे, गांधी बोरकर,मेश्राम सर , सौ रोकडे मॅडम, लडी सर, वामन गुळदे, माजी सरपंच सुनील गुळदे, प्रफुल डरे, रामदास भाऊ विताळे, नंदू चंदनखेडे, वरखेडे सर, डोंगरे सर इत्यादींची उपस्थिती होती याप्रसंगी संविधान उद्देश पत्रिकेची प्रस्ताविका प्रतिमेच्या स्वरूपात भेट देण्यात आली.

देशात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून संपूर्ण साजरा केल्या जातो. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी संघटनेच्या माध्यमातून ओबीसीच्या घरोघरी गावोगावी संविधान दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यात संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.

या दरम्यान महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी सुद्धा 28 नोव्हेंबर ला असल्याने विविध शाळा महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्य त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता आणि म्हणून चिमूर तालुक्यातील बोथली येथील भिवाजी वरभे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य कु. प्रेरणा बालपांडे. नरेंद्र विखार. विजय पिसे. संजय साखरकर विलास वरभे चंद्रकांत पोन्दे प्रणाली मेश्राम मयुरी नन्नावरे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here