Home मुंबई प्रहार :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची धुधु धुतली?

प्रहार :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची धुधु धुतली?

उद्धव ठाकरेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर एकतरी गुन्हा आहे का ? राजसाहेबांनी हा प्रश्न विचारून नक्कलही केली.

राजगर्जना ;-

शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे खरे राजकीय वारस राजसाहेब ठाकरेच असल्याच्या भावना अख्ख्या महाराष्ट्रातील मराठी जनतेत आहे व स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढच्या पिढीला तेच देत आहे, उद्धव ठाकरे हे केवळ पोकळ वल्गना करणारे नेते ठरत आहे कारण त्यांच्या स्वतःच्या बळावर पक्षाला उभारीदेणारीएकही घटना आजपर्यंत त्यांनी घडवली नाही कारण त्यांना भूमिकाच नाही फक्त हिंदुत्व हिंदुत्व करायचं जय श्रीरामाचागजर करायचा एवढंच त्यांनी आजवर केलंय खरं तर जरी आपल्या वडिलांकडून शिवसेना त्यांना वारस हक्काने मिळाली तरी ती शिवसेना त्यांना टिकवता आली नाही त्यामुळेचं एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केली, खरे तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाशी हात मिळवून बाळासाहेबांच्या विचारांना मातीत मिसळले असल्याचे कारण पुढे आल्याने शिवसेना फुटली, कारण बाळासाहेब नेहमी म्हणायचे की मी माझी शिवसेना एकटी लढेलपण काँग्रेस सोबत युती आघाडी करणार नाही पण सत्ता महत्वाची वाटल्यानेउद्धव ठाकरे यांनी आपल्याचवडिलांचे विचार बाजूला ठेऊन सत्ता मिळवली आणि आता शिवसेना दुभंगलेlली. आजही बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिवसेना कधी कुणी फोडू शकले नसते किंव्हा हीच शिवसेना राजसाहेब ठाकरे यांच्याकडे असती तर सुद्धा कुणाची हिंमत झाली नसती पण उद्धव ठाकरे यांना फक्त बाळासाहेब यांच्या वारसहक्काने सत्ता पाहीजे मग बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवल्या गेले तरी चालेल पण सत्ता यांना हविच आणि नेमका हाच हट्टाहास यांना नडला आणि मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले ही वस्तुस्थिती आहे.नव्हे पक्षाच्या प्रमुख मुख्यमंत्री पदावरून पायउतारहोतोय ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिनांक २७ नोव्हेंबर ला गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची धुधु धुतली. काल-परवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखा वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का?, असा सवाल राजसाहेब ठाकरेंनी उपस्थित केला. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात जसे ते आरोग्याचे कारण पुढे करून वागत होते त्याची नक्कल करून उद्धव ठाकरे ढोंगी असल्याचे दर्शविले.

मराठी किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी गुन्हा दाखल आहे का? त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. फक्त स्वार्थासाठी आणि पैशांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या. कधी हा तर कधी तो असं करत सत्तेत बसायचं. पाकिस्तानी कलाकार जेव्हा भारतात धुडगूस घालत होते, तेव्हा त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून मनसेनं त्यांना हाकलून दिलं होतं. तेव्हा हे हिंदुत्ववादी कुठे होते? आता ते म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. पण मी आधीपासूनच हिंदुत्ववादी आहे. एका हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी घरात माझा जन्म झाला आहे, असं राजसाहेब ठाकरे म्हणाले.

राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपली भूमिका मांडताना सांगितले की बाळासाहेबांची जी भूमिका होती की, भोंगे उतरले पाहिजे. ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा, असा इशारा राजसाहेब ठाकरेंनी दिला.

उद्धव ठाकरे का नाही बाळासाहेबांचे खरे राजकीय वारस ?

एखाद्या घराचा जेंव्हा मुखियास्वर्गवासीहोतो तर त्याची प्रॉपर्टीही वारस हक्काने ही त्यांच्या मुलांकडेजाते हा एक वर्शोगनिक आलेला व कायद्याने मान्यता दिलेला भाग आहे पण राजकीय वारसा हा विचारांचा असतो तो वास्तूंचा ठरत नाही त्यामुळे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेत कुठलेही योगदान नसतांना केवळ बाळासाहेबांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आली मुळात तिथेच बाळासाहेबांची चूक झाली हे कुठल्याही राजकीय तत्ववेत्ताम्हणेल आणि त्यामुळेच कदाचित पात्रता नसतांना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आली ती जबाबदारी उद्धव ठाकरे पेलू शकले नाही आणि शिवसेना दुभंगलेली ही वस्तुस्थिती आहे.जेव्हापासूनशिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आली तेव्हापासून केवळ बाळासाहेबांच्या नांवावर आणि त्यांच्याच कृपेवर सगळं शिवसेनेचं गणित चाललंय.सन 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांच्या आठवणी समोर करून व त्यांच्या नावाने मत मागून 60 पेक्षा जास्त आमदार निवडून आले तर 2019 मधे भाजप सोबत युती केल्याने 56 आमदार निवडून आणता आले पण तेही बाळासाहेबांच्या जीवावर पण उद्धव ठाकरे यांनी आजवर जे हिंदुत्व भगव्याच असल्याच्या बाता भाषणातून केल्या त्या केवळ पोकळ असून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठीएकही गुन्हा अंगावर घेतला असल्याचा इतिहास नाही नव्हे राजकीय नेत्रुत्व करतांना त्यांच्या अंगावर एकही केस नाही कारण त्यांना काही भूमिकाच नाही. आजही उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर जगतअसल्याच्या भावना सुद्धा महाराष्ट्रात समाजमनावरउमटत आहे.त्यामुळं उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारस असुच शकत नाही असेच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here