Home चंद्रपूर इन्स्पायर या शैक्षणिक खाणीतून हिरे तयार होत राहो, आनंद कुमार यांचे प्रतिपादन.

इन्स्पायर या शैक्षणिक खाणीतून हिरे तयार होत राहो, आनंद कुमार यांचे प्रतिपादन.

शाईन आउट टॅलेंट एक्सप्लोर एक्झाम, मध्ये पहिल्या 30 आलेल्या विद्यार्थ्यांचा आनंद कुमार यांच्या हस्ते सत्कार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक संस्था कार्यरत आहे पण सध्या जेईई / नीट साठी अव्वल दर्जाचे निकाल देणारी शिक्षण संस्था म्हणून इन्स्पायर पुढे आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रोत्साहणासाठी नुकताच या संस्थेतर्फे 15 जानेवारी 2023 ला शकुंतला फार्म चंद्रपूर मध्ये ‘सुपर 30′ पटनाचे आनंदकुमार यांना आमंत्रित करून तब्बल 6 हजार विद्यार्थ्याना त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले, या कार्यक्रमात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर तसेच प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ. आशिष बदखल आणि इन्स्पायर चे संचालक प्रा. विजय बदखल मंचावर उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर आनंदकुमार यांच्या नावाची दखल घेतली जातं असून अत्यंत साधी राहणीमान असलेल्या या व्यक्तीने चंद्रपूरच्या युवा आणि विद्यार्थी वर्गावर आपल्या व्याखानातून मोठी छाप सोडली आहे.’आयुष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्याचं बळच माणसाला मोठं बनावतं’ आणि संघर्ष, मेहनती शिवाय काहीच साध्य होतं नाही त्यामुळं मेहनत आणि संघर्ष करा व आपल्या परिवाराचे नाव मोठे करा असा गुरुमंत्र आनंद कुमार यांनी प्रा. विजय बदखल यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्याना  दिला.

या कार्यक्रमात इन्स्पायर तर्फे ८ जानेवारी 2023 ला घेण्यात आलेल्या ‘शाईन आउट टॅलेंट एक्सप्लोर एक्झाम, मध्ये पहिल्या 30 आलेल्या विद्यार्थ्यांचा आनंदकुमार हस्ते सत्कार करण्यात आला तसेच इन्स्पायर मधून जेईई मध्ये जिल्ह्यात पहिले आलेले विष्णू बाराई, आकाश बिसवास, सार्थक माधमशेट्टीवार(विदर्भातून पाचवा आणि जिल्ह्यात पहिला) आणि जिल्ह्यात दुसरा आलेला महावीर खजांची सोबतच नीट मध्ये जिल्ह्यात पहिले आलेले परिमल पोटे, प्रज्वल पेटकर, हर्ष वडलकोंडा, कोमल सुकारे आणि जिल्ह्यात दुसरे आलेले ऐश्वर्या सोनकुसरे, आदित्य टेंभुर्कर यांचाही सत्कार आनंद कुमार हस्ते झाला. यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना, ‘असंच घवघवीत यश प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत राहो आणि प्राध्यापक विजय बदखल यांच्या इन्स्पायर या शैक्षणिक खाणीतून हिरे तयार होत राहो अशा शुभेच्छा आनंद कुमार यांनी दिल्या. या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिर खान यांनी केले असून या कार्यक्रमात इन्स्पायरचे राकेश नगराळे, लक्ष्मी वनकर, रिद्धी तिवारी, प्रिया दुदानी, काजल जेठवानी, मेघा दखणे, अनिता राजूरकर, स्वप्निल चिमूरकर, ज्योत्स्ना बोबडे, नूर शेख, प्रदीप नगराळे, संदीप पोटे, स्वप्निल वालके, मंगल दुबे, मधुकर राजूरकर, आकाश देशकर, सुरेश मेश्राम आणि पपीता जुमडे व इतर कर्मचारी वर्गाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here