Home चंद्रपूर *पं. दीनदयाल उपाध्‍याय यांचे जीवनकार्य आचरणात आणावे – राजेंद्र गांधी*

*पं. दीनदयाल उपाध्‍याय यांचे जीवनकार्य आचरणात आणावे – राजेंद्र गांधी*

*भाजपा कार्यालयात पं. दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या स्‍मृतींना आदरांजली.*

जनसामान्‍यांपर्यंत भारतीय जनता पक्ष घेवून जाण्‍याचे महान कार्य पं. दीनदयाल उपाध्‍याय यांनी आयुष्‍यभर केले त्‍यामुळे त्‍यांना प्रेरणास्‍थानी ठेऊन भारतीय जनता पार्टीच्‍या कार्यकर्त्‍यांनी पक्षासाठी कार्य करावे असे प्रतिपादन भाजपा चंद्रपूर महानगर संघटन मंत्री राजेंद्र गांधी यांनी केले. भाजपा चंद्रपूर महानगरच्‍या वतीने राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा कार्यालयामध्‍ये पं. दीनदयाल उपाध्‍याय यांना स्‍मृतीदिनी आदरांजली वाहण्‍यात आली.

दिनांक ११ फेब्रुवारी रोजी गिरनार चौकातील भाजपा कार्यालयामध्‍ये पं. दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण करून त्‍यांच्‍या स्‍मृतींना आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी पक्ष मतबुतीकरणाकरिता कार्यकर्त्‍यांनी सातत्‍याने कार्य करावे तसेच पं. दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या ग्रंथसंपदेचे वाचन करून ते आचरणात आणावे व सातत्‍याने पक्षवाढीकरिता कार्य करावे, असे राजेंद्र गांधी म्‍हणाले. यावेळी महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरूनुले, महानगर महिला मोर्चा अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, माजी उपमहापौर राहूल पावडे, भाजपा महिला जिल्‍हाध्‍यक्षा (ग्रामीण) अल्‍का आत्राम, शिला चव्‍हाण, माया उईके, राहूल संतोषवार, मंडळ अध्‍यक्ष विठ्ठल डुकरे, संदीप अगलावे, रवि लोणकर, सचिन कोतपल्‍लीवार, प्रमोद शास्‍त्रकार, डॉ. भारती दुधानी, तेजा सिंह, चॉंद भाई पाशा, रामकुमार आकापेल्‍लीवार, धनराज कोवे, नितीन कार्या, बंडू गौरकार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here