विश्वकर्मा जयंती उत्सव, लोहार समाज पोटजाती विकास संस्थेचे आयोजन
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:- स्पर्धेच्या युगात अनेक सेवेकरी समाज आर्थिक आणि शैक्षणीक क्षेत्रात मागे पडत आहे. आदिम काळापासून मानवी विकासात व समाज व्यवस्थेत अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणारा कष्टाळू व प्रामाणिक असलेला लोहार समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरावला जात आहे. दुसर्यांची सेवा करत असतांना आम्ही सेवेकरी म्हणूनच राहलो. सेवेत आम्ही सत्ता मात्र दुसर्यांच्या घरी हि परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आता सर्व सेवेकरी समाजाने सेवे सोबत सत्तेत यावे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
लोहार समाज पोटजाती विकास संस्थेच्या वतीने मुल रोड वरील विश्वकर्मा भवन येथे विश्वकर्मा जयंती उत्सव, विदर्भ स्तरीय भव्य वधू – वर परिचय मेळावा आणि प्राम पंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा ओबीसी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सुरेश मांडवगडे, एस.एस कामतकर, माजी उपमहापौर अनिल फुलझले, नुभय शेंडे, नरेंद्र मेश्राम, आनंद अंगलवार, लता सोनटक्के, आनंदराव बावणे, हरिदास चंदनखेडे, पालकर कोसरे, गोपला शेंडे, संतोष चंदनखेडे, राजू घरोटे विजयराव पोहनकर, सूर्यभान सोनटक्के, धनराज दुर्गे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले कि,लोहार समाजाचा पारंपरिक व्यवसाय संपुष्टात आला असला तरी कारागिरांची संख्या अजूनही मोठया प्रमाणात आहे. त्यांनी त्यांच्यातील या गुणाला तत्रज्ञाणाची जोड द्यावी, यात अडचणी येत असल्यास शक्य ती मदत करण्याची आमची तयारी असल्याचे यावेळी ते म्हणाले. विश्वकर्मा हे लोहार समाजाचे दैवत आहेत. दरवर्षी त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करतो, समाजाच्या एकत्रीकरणावर तसेच समाज उत्थानासाठी करावयाच्या प्रयत्नांवर यानिमित्ताने चर्चा केली जाते. त्यामूळे अशा आयोजनात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आजच्या या कार्यक्रमात वधु – वर परिचय मेळावा पार पडणार आहे. हे मेळावेही समाजासाठी गरजेचे आहे. यातून आपली संस्कृती जपल्या जाते. त्यामुळे असे आयोजनही समाजाने नियमीत करावे. लोकप्रतीनीधी म्हणून लोहार समाजा सोबत मी नेहमी असणार आहे. समाजाने समाजातील अडचणी आमच्या प्रयत्न पोहचवाव्यात. समाजातील दुख, व्यथा, वेदना आपल्या माध्यमातून आमच्या पर्यत्न पोहचल्या पाहिजे. त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे यावेळी ते म्हणाले. आपण समाजाच्या समाज भवणासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. आपण हा निधी वाढून मागीतला आपली हि मागणी मान्य असल्याचे सांगत या कामासाठी 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आणि हा शेवट नसुन पूढे ही समाजाने सुचविलेल्या कामांना प्राधाण्यपूर्ण केल्या जाईल असेही यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.