स्केटींग, हॅन्ड बॉल, बॅटमिंटन स्पर्धेचे पुरस्कार वितरीत
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:- तीन दिवस रंगलेल्या कुस्तीच्या थरारक सामन्यांना काल पार पडलेल्या अंतिम सामन्याने समारोप करण्यात आला. यात युवती खुल्या गटात अहमदनगरची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड ही श्री माता महाकाली राज्यस्तरीय कुस्ती चषक ची मानकरी ठरली आहे. तर पुरूष खुल्या गटात बीड जिल्ह्यातील गोकुळ आवारी हे चषकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत चंद्रपूरातील कुस्ती पट्टंूनीही घवघवीत यश मिळविले असुन विविध सहा गटात प्रथक क्रमांक पटकविला आहे. सदर क्रीडा महोत्सवातील स्केटींग, हॅन्ड बॉल बॅट मिंटन स्पर्धेचाही बक्षिस वितरण सोहळा पार पडला आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव क्रीडा प्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरत आहे. यात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्य भरातील नामांकित कुस्तीपट्टूंनी सहभाग घेतला होता. तीन दिवस चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रांगणावर रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळ्याने समारोप करण्यात आला आहे. यात अहमदनगर येथील आंतराष्ट्रीय महिला कुस्ती पट्टू भाग्यश्री फंड ही खुल्या गटात प्रथम आली आहे. तर पुरुष खुल्या गटात बीड जिल्ह्यातील गोकुळ आवारी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या विजेत्या स्पर्धकांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते रोख रक्कम, शिल्ड आणि मानाचा गदा देण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, बाळू कातकर, श्याम धोपटे, कुनाल चहारे, वासू देशमुख, धनंजय येरेवार, अब्दुल काजी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
ओबीसी मगास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी कुस्ती स्पर्धेला भेट देत कुस्तीपट्टुंचा उत्साह द्वीगुणीत करत क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. सदर कुस्ती स्पर्धेत चंद्रपूरच्या कुस्तीपट्टूंनी यश प्राप्त करत आपल्या कुस्तीचे डावपेच महाराष्ट्राला दाखविले आहे. यात 65 किलो वजन गटामध्ये हितेश सोनवणे, 57 कीलो वजनगटात शहबाज खान, 53 किलो वजन गटात निखील नक्षिणे, 46 किलो वजन गटात रोहित गौहकार 43 किलो वजन गटात नकुल राउत, 35 किलो वजन गटात भावेश बनसोड या चंद्रपूरच्या कुस्ती पट्टूंनी प्रथम क्रमांक पटकविला आहे. तर नागपूर येथील क्रीडा प्रबोधनी ए या संघाने पहिला क्रमांक, व मुबंई पोलिसच्या संघानी दुसरा क्रमांक पटकावला. सदर क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला काल शुक्रवार पासुन सुरुवात झाली असुन कबड्डी स्पर्धा भिवापूर वार्ड माता नगर चौक येथे तर हॉली बॉल स्पर्धा विठ्ठल मंदिर वार्डातील टागोर शाळेच्या प्रागंणात खेळल्या जात आहे. या स्पर्धांचा क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत लाभ घ्यावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. सदर आयोजनात चंद्रपूर तालीम संघ, जय श्रीराम क्रीडा युवक व व्यायाम प्रसारक मंडळ, मथुरा बहुउद्देशीय संस्था, स्केटींग असोशिएशन चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, चंद्रपूर जिल्हा बॅटमिंटन डेव्हल्पमेंट असोशीएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे