बक्षिस वितरण सोहळ्याने विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचा समारोप
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तथा चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशन यांच्या सहकार्याने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचा बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला आहे. या स्पर्धेत अमरावतीचा विजय भोयर आमदार श्री पूरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर चंद्रपूरातील आशिष बिरीया हा बेस्ट पोझर आणि अकोला जिल्हातील शेख सलिम हा बेस्ट इम्प्रुमेंट आॅफ इअर चा पुरस्कार पटकविला आहे.
मान्यवरांच्या हस्ते सर्व विज्येत्या स्पर्धकांना शिल्ड, रोख रक्कम, प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कार्यक्रमाचे विशेष आर्कषण असलेले 2018 चे मिस्टर ऐशीया सुनीत जाधव, काॅंग्रेस सेवादलचे सुर्यकांत खणके, माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बाॅडी बिल्डिंग अॅन्ड स्पोट्स असोशिएशनच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 21 प्रकाराच्या खेळांचे विविध 10 ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दरम्याण सदर क्रीडा महोत्सवा अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रागंणावर विदर्भस्तरीय बाॅडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला सहा वेळा मिस्टर महाराष्ट्र, 3 वेळा मिस्टर इंडिया आणि 2018 सालचे मिस्टर ऐशिया ठरलेले सुनीत जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत विदर्भातील नांमाकीत बाॅडी बिल्डलांनी सहभाग घेतला होता. सदर बाॅडी बिल्डींग स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर स्पर्धा 55 कीलो, 60 कीलो, 65 कीलो, 70 कीलो, 75 कीलो आणि 75 प्लस अशा सहा वजन गटात घेण्यात आली. यात चंद्रपूरातील बाॅडी बिल्डरांनीही यश संपादीत केलेे आहे.
भविष्यात चंद्रपूरातील बाॅडी बिल्डर हा देश पातळीवर पोहचावा या दिशेने आम्ही प्रयत्न करु, शक्य असल्याचा उत्तम प्रशिक्षकाची यासाठी नेमणुक करु, चंद्रपूरात आता या खेळाचे महत्व वाढत चालले आहे. अनेक युवक यात सहभागी होत आहे. आपण अशा स्पर्धा आता नियमीत आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. चंद्रपूरात आल्यानंतर बाॅडी बिल्डींगसाठी नागरिकांमध्ये असलेली आवड कौतुकास्पद आहे. येथे जमलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे या बाॅडी बिल्डरांना उर्जा मिळणार असल्याचे यावेळी सुनीत जाधव म्हणाले.
श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित विदर्भ स्तरीय स्विमिंग स्पर्धा, विदर्भ स्तरीय फुटबॉल स्पर्धा आणि जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून सदर तीनही स्पर्धेचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला.