Home चंद्रपूर सिंदेवाहीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ

सिंदेवाहीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ

पाच मोबाईल गेले चोरीला

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-सिंदेवाही तालुक्यात दर सोमवारला आठवडी बाजार भरत असतो, सिंदेवाही तालुका आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने इथे बहुतांश नागरीक आठवडी बाजारात येत असतात. तालुक्यातील मोठा बाजार म्हणून ग्रामीण भागातील नागरिक ठोक व घरेलू खरेदीसाठी बाजारात येतात. लाडबोरी मधील जयेंद्र कारमेंगे हे आठवडी बाजारात बाजारात आले असता, नेहमी प्रमाणे बाजार करीत असतांना एका भाजी दुकानावर भाजी घेत असतांना भुरटे चोर लक्ष ठेऊन होते, त्यांचा कडे असलेला १५,००० रु किमतीचा मोबाईल ची क्षणात चोरी केली व त्याच सोबत इतर चार व्यक्तीच्या बाजारातील वेगवेगळ्या ठिकाणा वरून मोबाईल लंपास केले, या भुरट्या चोरांनी बाजारामधून जवळपास एकूण ५०, मोबाईल ची चोरी केली आहे, ते ६० हजार किंमतीच्या

आठवडी बाजारात नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी मोबाईल चोरणारे भुरटे चोर सक्रिय झाले आहेत, पाहता पाहता बाजारामधून ५ व्यक्तीचे मोबाईलची चोरी झाली आहे. हे भुरटे चोर गर्दी असलेल्या भाजी विक्रेतेच्या ठिकाणी जाऊन अगदी समोरच्या व्यक्तीला माहिती होऊ न देता मोबाईल चोरी करीत आहे, पोलीस प्रशासन आठवडी बाजारात गस्त देत असतात, पण हे भुरटे चोर गुंगारा देत आपली मोबाईल चोरीची कामगिरी प्रत्येकांची नजर चोरून करीत आहे. अश्या चोरीत अल्पवयिन मुले सुद्धा सहभागी असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

Previous articleचंद्रपूरातील महिला रमल्या आठवणींच्या गावात
Next articleउन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here