Home चंद्रपूर बिनबा गेट परिसरात सुशोभीत सौंदरीकरण करा

बिनबा गेट परिसरात सुशोभीत सौंदरीकरण करा

समता संघर्ष समितीची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर-बिनबा गेट परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्याकरिता महानगर पालिकेने चौकात सौंदर्यीकरण करून जेष्ठ नागरिकाकरिता बैठक व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांनी केली आहे.
बिनबा गेट परिसरात प्रचंड प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या परिसरात महानगर पालिकेच्या मालकीची जागा असून ती लहान मोठ्या व्यावसायिकानी त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वार्डातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.तसेच असामाजिक तत्वांची गर्दी होत आहे. त्यावर उपाय म्हणून मनपा ने आपल्या मालकीच्या जागेत वॉल कंपाऊंड तयार करावे व तेथे सौंदर्यीकरण करावे.जेष्ठ नागरिकांकरिता बैठक व्यवस्था करावी,व्यायाम साहित्य उपलब्ध करावे, विद्युत पुरवठा करून रोषणाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या परिसरात अलीकडेच वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहे, मात्र रस्ता दुभाजक तयार केले नसल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथे रस्ता दुभाजक तयार करावी अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन सादर करताना हाजी सय्यद हारून सहाब , अय्युब खान रुस्तम खान आमिन खान, हर्षद कानमपल्लीवार, विनोद अनंतवार, मोहम्मद कादर शेख आदी उपस्थित होते.

Previous articleदखलपात्र:- मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला,
Next articleधक्कादायक :- भद्रावतीमधे अनैतीक देहव्यापार सुरू, पोलिसांची धडक कारवाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here