Home चंद्रपूर सीएसटीपीएसमधे सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर येणार ?

सीएसटीपीएसमधे सर्वात मोठा कोळसा घोटाळा बाहेर येणार ?

कोळसा पुरवठादार, कोल वॉशरिजचे अधिकारी व सीएसटीपीएस मुख्य अभियंता व इतरांच्या संगनमताने कोळसा चोरी?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला वेकोलि कोळसा खाणीतून मिळणारा कोळसा हा धुवून देण्यासासाठी कोलवाशरीज कंपनीची नियुक्ती करते. कारण कोळसा खाणीतून मिळणाऱ्या कोळशात दगड, माती, शेल ( उष्मांक नसलेला पांढरा कोळसा ) यात असते. त्यामुळे या कोळश्याला स्वच्छ करून दगड, माती वेगळी केली जाते. त्यानंतर पाण्याने धुवून जास्त उष्मांकचा कोळसा वेगळा करत यापासून वीज निमिर्तीसाठी वापरला जातो. पण प्रत्यक्ष आता जर याबाबत आकडेवारी बघितली तर या कोळश्यापासून कुठलाच फायदा झाला नाही. अथवा कोळसा धुतल्याने अधिक विज निमिर्ती झाली नाही, असा निष्कर्ष खुद्द वीज निर्मिती केंद्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होतं आहे. यावरून वीज निर्मितीसाठी महानिर्मितीचे अधिकारी कोलवाशरीजच्या अधिकाऱ्यांशी व मालकांशी संगनमत करून निकृष्ट दर्जाचा दगड माती मिक्स करून पाठवलेला कोळसा वापरून राज्याच्या वीज निर्मिती केंद्रात कोट्यावधी रुपयांचा कोळसा घोटाळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महाऔष्णिकविद्युत केंद्रात वॉशरिज मार्फत वीज निर्मिती करिता दिल्या जाणाऱ्या कोळशाची मोठी हेराफेरी केली जातं असून निकृष्ट दर्जाचा गोटे माती राख मिश्रित कोळसा पाठवून चांगल्या दर्जाच्या कोळश्याची विक्री खुल्या बाजारात कोल वॉशरिज च्या माध्यमातून होतं असल्याचे कित्तेक पुरावे समोर येऊन सुद्धा हा धंदा बंद झाला नसल्याने या धंद्यात सीएसटपीएस चे अधिकारी, कोल वॉशरिजचे संचालक व ट्रेन्स्पोर्टेशन करणारे कंत्राटदार यांचा सुनियोजित कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य खणिकर्म महामंडळ नागपूर यांचा सुद्धा सहभाग असल्याची माहिती समोर येत असून मागील सन 2020-21च्या दरम्यान या मंडळाचे अधिकार काढण्यातआले होते.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार मधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गठीत करून चौकशीचे आदेश दिले होते, मात्र त्या चौकशीचे नेमके काय झाले आणि कुणावर कारवाई झाली हे गुलदस्त्यात असल्याने ती समितीच चौकशीच्या घेऱ्यात अडकली असल्याचे चित्र दिसत आहे.कारण जे कोल वॉशरिजचे संचालक आहेत ते कोळशाच्याया धंद्यात माहीर असून त्यांचे कोळसा मंत्रालयापर्यंत वशिले चालतातत्यामुळे विभागीय स्थरावरत्यांचे अधिकाऱ्यांशी असलेले आर्थिक हितसंबंध हेच कोळसा चोरीलाचालना देणारे ठरत आहे.त्यात सीएसटपीएस चे मुख्य अभियंता यामध्ये सरळ सहभागी नसले तरी या ठिकाणी दररोज लाखों टनकोळसा येतो कसा याबद्दल तरी त्यांना माहिती नसावी हे शक्य नाही.कारण काही वर्षांपूर्वी यांचं सीएसटपीएस मधे ट्रांसपोर्टर द्वारा खुल्यामार्केट मधे कोळसा विकल्या जातं असल्याचे प्रकरण समोर आले होते व त्या प्रकरणात त्या ट्रांसपोर्टर यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले होते.

वेकोलि कोळसा खाणीतून मिळालेल्या एकूण कोळश्यातील 15 टक्क्यापर्यंत कोळसा हा रिजेक्ट केला जाऊ शकतो, असे खनिकर्म महामंडळाची नियमावली आहे. त्यामुळे हा रिजेक्ट कोल वाशरीजला 600 रुपये प्रति टनाने परत मिळतो. पण, हा रिजेक्ट कोळसा खुल्या बाजारात 15 हजार रुपये टनाने विकला जातो. त्यामुळे तो कोळसा जाणीवपूर्वक रिजेक्शन करून खुल्या बाजारात विकला जात आहे व यामध्ये कोल वॉशरिज चे मालक कोळसा वाहतूक करणारी कंत्राटी कंपनी व सीएसटीपीएसचे अधिकारी यांचे टक्के ठरलेले आहेत त्यामुळे सीएसटपीएस ला कोण कोळसा पुरवठा करतो व त्यांच्याकडून पुरवठा केलेल्या कोळशातकिती दगड माती स्पंज आयर्न व फ्लाय ऐश मिसळलेल्या जाते त्याची पोलखोल होऊ शकते पण कोळसा हँडलिंग प्लांट मधे राज्य सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस असल्याने  नेमकी स्थिती काय आहे हे कळायलामार्ग नाही.मात्र विशेष सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कोल वॉशरिजचा धुतलेला व साफ केलेला कोळसा पूर्णपणे सीएसटपीएस ला येत नाही तर मिक्स कोळसा येतो त्यामुळे राख व दगड आजही कोळसा हँडलिंग प्लांट मधे पडून असल्याचे समोर आल्याने इथे मोठा कोळसा घोटाळा होतं असल्याचे स्पष्ट होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here