Home चंद्रपूर धक्कादायक :- स्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत सापांचे वास्तव ?

धक्कादायक :- स्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत सापांचे वास्तव ?

समाजकल्याण अधिकारी यांचे हे कसले परीक्षण ? संस्थाचालकांची मुजोरी आणि हतबल कर्मचारी यामुळे विद्यार्थी दहशतित ?

चंद्रपूर प्रतिनिधी :

श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत स्विकार दुर्बल मनरक (मतिमंद) मुलांच्या निवासी शाळेत संस्थाचालक यांची मनमानी व मुजोरी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर अधिकारांवर गदा आणणारी व त्यांचे सेवा स्वांतंत्र्य हिरावून घेणारी ठरत असतानाच आता त्या शाळेत सापांचे वास्तव असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सुद्धा तेथील संस्थाचालक व समाजकल्याण अधिकारी यांना ते वास्तव दिसू नये यांचं आश्चर्य वाटतं आहे, दरम्यान शाळेच्या भिंतींना ज्या पद्धतीचे तडे गेले आहे व शाळेला वॉल कंपाऊंड नाही त्यामुळे सापांचे वास्तव आहे व दिव्यांग विद्यार्थ्याना यापासून धोका आहे त्यामुळे या शाळेत पायाभूत सुविधा करणे गरजेचे असताना संस्थाचालक कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या भरोशावर शाळेचा खर्च भागवून किती वर्ष शासनाकडून मिळणारे अनुदान स्वतः लाटणार आहे ? हा गंभीर प्रश्न येथील कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक यांना पडला आहे.

या संस्थेचे सचिव रेखाताई पिंपळशेंडे ह्या असुन संस्थेचे अध्यक्ष त्यांचे चिरंजीव नितीन गोरेश्वर पिंपळशेंडे आहे व तेच शाळेच्या शिपाई पदावर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे, पण ते केवळ पंधरा दिवसातून एक वेळा शाळेत येऊन रेकॉर्डवर सह्या करतात त्यामुळे शाळा म्हणजे यांचा खाजगी व्यवसाय असल्याचे स्पष्ट दिसत आहे एकूणच आई मुलगा हे दोघेही शासनाच्या अनुदानाचा केवळ फायदा घेत स्वतःच्या तुंबड्या भरताहेत पण शाळेची दुरावस्था ज्या पद्धतीने झाली आहे, शाळेच्या भिंतीं दुभंगलेल्या आहे, शौचालयात भेगा पडलेल्या आहे त्या शौचालयाला दरवाजे नाहीत तर आजुबाजुला जंगल सारखा परिसर असल्याने व शाळेला वॉल कंपाऊंड नसल्याने जंगली हिंस्त्र प्राण्यांची भीती व सापांची भीती आहे, त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी दहशतीत असतांना समाजकल्याण अधिकारी नेमके कशाचे परीक्षण व निरीक्षण करताहेत हेच कळायला मार्ग नसून यांना केवळ कमिशन खाण्यासाठीच नेमले आहे कां ? असा संतप्त सवाल कोणीही सुजाण नागरिक विचारेल एवढी गंभीर परिस्थिती या शाळेची संस्थाचालक व समाजकल्याण अधिकारी यांनी करून ठेवली आहे.

खरं तर कुठल्याही संस्थेचे संस्थाचालक हे त्या संस्थेचे मालक जरी असले तरी त्यांचा त्यामागे हेतू हा त्यांनी उभारलेल्या शाळेच्या प्रगतीचा असला पाहीजे व सेवेचा असला पाहीजे एवढेच नव्हे तर तेथील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून शाळेच्या प्रगतीचा विचार असला पाहीजे पण संस्थाचालक जणू मालकी हक्काचा रुबाब दाखवून वर्षातून एका महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन शाळेच्या विद्यार्थ्याच्या खाना खर्च व इतर सुविधेसाठी घेतात व इतर खर्च सुद्धा त्यांनीच करावा अशा पद्धतीने त्यांचा दबाव असतो, एवढेच नव्हे तर कोणत्या कर्मचाऱ्याने त्यांचे म्हणणं ऐकलं नाही तर त्यानां कामावरून कमी करतात, त्यांना घरी बोलावून घरगुती कामे करायला लावतात व त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देतात त्यामुळे त्यांचे असले उपद्व्याप हे कर्मचाऱ्यांच्या हक्क अधिकारावर एक प्रकारे गदा आणणारे असून यावर वेळीच जर प्रतिबंधक झाला नाही तर एक दिवस हेच कर्मचारी आंदोलन करून संस्थाचालकांचे वाभाडे काढतील व या शाळेवर प्रशासक बसून संस्थाचालकांनाच ही शाळा सोडावी लागेल अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मनसे तर्फे दिव्यांग विकास आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर त्यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here