आराध्यदैवत महाकालीच्या दर्शनास आलेल्या भक्तांना केले अन्नदान
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:–आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या माता महाकालीच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भक्तगण श्रद्धाळू आपा आपली मन्त पूर्ण करण्यासाठी,दरवर्षी चैत्र मास मध्ये महाकाली महोत्सव निमित्त जत्रा भरत असतात,या जत्रेत प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील बहुतांश असंख्य लोक कुळ दैवत समजून माता महाकालीचे दर्शन घेण्यास परिवारासह येऊन रहातात,
त्यांच्या खाण्या पिण्यात गैरसोय होऊ नये म्हणून अनेक संस्था किंवा इतर कोणीही दर्शनाला आलेल्या भक्तांना अन्न दान करून कोणत्याही भक्ताची हयगय होऊ नये यासाठी एक पुण्याचे कार्य समजून सतत तत्परतेने सेवा करण्यास तयार असतात,
असेच महान कार्य स्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेच्या वतीने महाकाली मंदिरातील परिसरातील भक्तांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी जाऊन अन्न दान करून नवा उपक्रम राबविले.
यावेळी स्त्री शक्ती बहुउदेशी संस्थेच्या अध्यक्षा:-सायलीताई येरणें,उपाध्यक्षा:-ऍड.वीणा बोरकर, सचिव:-संतोषिताई चौहान, कोषाध्यक्ष:-अल्काताई मेश्राम आणि प्रतिभाताई लोनगाडगे,प्रेमीलाताई बावणे,माधुरीताई निवलकर इत्यादी उपस्थित होते,