Home चंद्रपूर स्वयंरोजगार निर्मिती करिता पठाणपूरा येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निशुल्क शिवणकाम प्रशिक्षण

स्वयंरोजगार निर्मिती करिता पठाणपूरा येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निशुल्क शिवणकाम प्रशिक्षण

अल्पसंख्याक विभागाचा उपक्रम, शेकडो प्रशिक्षणार्थींनी घेतला सहभाग

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-    चंद्रपूर शहरातील गरजु होतकरु महिलांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने निशुल्क शिवणकाम प्रशिक्षण अभियान सुरु करण्यात आले असुन स्वावलंबी नगर, बिनबा गेट नंतर आता पठाणूरा येथे सदर प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उदघाटण करण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, रुपा परसराम, विमल काटकर, आशु फुलझेले, कविता निखारे, निलिमा वनकर, कविता शुक्ला, सोनाली आंबेकर, अनिता झाडे आदिंची उपस्थिती होती.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान शिलाई कामाची आवड असलेल्या होतकरु महिलांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरात शिवणकामचे निशुल्क प्रशिक्षण दिल्या जात आहे. स्वावलंबी नगर, बिनबा गेट नंतर आता पठाणूरा वार्ड येथे सुरु करण्यात आलेले हे प्रशिक्षण केंद्र महिनाभर चालणार आहे. येथे शिलाई, कपडा कापणे, फॅशन डिजाईन आदी प्रकार शिकविण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रात सध्या शेकडो महिलांना प्रशिक्षण दिल्या जात असुन प्रशिक्षण प्राप्त महिलांना शासनाच्या शिलाईकाम संदर्भातल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रयत्न केल्या जाणार असल्याचे उपक्रमाच्या संयोजिका यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पंसख्यांक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान यांनी म्हटले आहे. यावेळी प्रशिक्षणार्थींसह स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous articleपर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार
Next articleअवैध बांधकाम व जीर्ण झालेल्या दुकानांवर मनपाने चालवला बुलडोझर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here