Home चंद्रपूर अखेर घुग्गुस ठाणेदार आशिफ़ रझाच्या गुंडगिरीची पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल.

अखेर घुग्गुस ठाणेदार आशिफ़ रझाच्या गुंडगिरीची पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल.

हसन सिद्दीकी या तरुण इंजिनिअरच्या अपघाताच्या चौकशीत कसूर केल्याप्रकरणी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलने प्रकाशित केली होती बातमी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

घुग्गुस पोलीस स्टेशन चे ठाणेदार अशिफ़ रझा यांच्या गुंडगिरी प्रव्रुतिने अगोदरच येथील सर्वसामान्य नागरिक व त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे पत्रकार संतापले असतांना काही दिवसांपूर्वी घुग्गुस तेथे हसन सिद्दीकी या तरुण इंजिनिअर युवकाचा अपघाती मृत्यु झाला होता त्या अपघाताची आठ दिवसांपासून साधी चौकशी सुद्धा ठाणेदार आशिफ़ रझा यांनी केली नव्हती, शिवाय चौकशी अधिकारी आमटे यांची टीव्ही न्यूज पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी स्वतः कबूल केले की आम्ही अपघात करणाऱ्या गाडी चालकांची मेडिकल टेस्ट केली नाही व त्याला आम्ही केवळ सूचनापत्रावर सोडून दिले होते, आम्ही सीसीटीव्ही कैमेरे तपासले नाही पण आता तपासात आहे म्हणजे या प्रकरणाची कुठेही चौकशी न करता हे प्रकरण जणू थंड बस्त्यात गुंडाळले जाण्याची शक्यता होती त्यामुळे या प्रकरणी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल ने वाचा फोडली व यामध्ये ठाणेदार व चौकशी अधिकारी यांनी कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जनतेतुन होतं असल्याची बातमी प्रकाशित केली. भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर आलेल्या बातमीने ठाणेदार आशिफ़ रझा यांची झोप उडाली व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार यांनी दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष घुग्गुस पोलीस स्टेशन ला भेट देऊन अपघात स्थळांची सुद्धा पाहणी केली.

अगोदरच घुग्गुस शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना उधान आले असून कोळसा चोरी. सट्टापट्टी, दारू तस्करी, रेती तस्करी व चरस गांजा यांची खुलेआम विक्री या अवैध व्यवसायाला बळ मिळाले असताना हसन सिद्दीकी नामक युवा इंजिनिअर तरुणाचा ज्या गाडीने अपघात झाला त्या गाडी चालविणाऱ्या ड्राइवरला सोडून दुसऱ्या ड्रायवरला समोर केल्या जाते व त्याहून कहर म्हणजे त्या ड्राइवर ची मेडिकल टेस्ट न करता त्याला परस्पर सूचनापत्रावर सोडून देण्यात येते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरचं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या घटनेची चौकशी व्हायला हवी व त्या तरुण इंजिनिअर च्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलने बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसींग परदेशी यांनी घेतली व या घटनेची चौकशी पीएसआय आमटे यांच्याकडून काढून ती साहाय्यक पोलीस निरीक्षक साखरकर यांच्याकडे दिली, दरम्यान ठाणेदार आशिफ़ रझा यांच्यावर पण विभागीय चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिले असल्याने ठाणेदार आशिफ़ रझा यांची लवकरच उचलबांगडी होईल अशी शक्यता आहे.

ठाणेदार  आशिफ़ रझा यांची गुंडगिरी आली त्यांच्याचं अंगलट? ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यास ठाणेदार होणार निलंबीत?.

स्वतःला हुशार बुद्धिमान समजणारे अनेक ठाणेदार आजवर झाले पण स्वतःला सर्वात मोठा गुंड समजणारा ठाणेदार फक्त आशिफ़ रझाचं असावा अशी परिस्थिती असून दहा ते बारा दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन मधे तक्रार घेऊन आलेल्या एका महिलेला ह्याच ठाणेदार रझा यांनी शिवीगाळ देऊन पोलीस स्टेशन बाहेर काढले होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळतील, शिवाय इंजिनिअर हसन सिद्दीकी यांचा अपघाती मृत्यू झाला त्याची चौकशी न करता उलट त्याचे वडीलाना तुम्ही बिना लायसन्स वाला ड्राइवरवर ब्लेम कराल तर तुम्हचि केस मी वर्षभर होऊ देणार नसल्याची धमकी दिली. दरम्यान  या बाबत बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला फोनवरून धमकी दिल्याने त्यांची ही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यास ठाणेदारयांची नौकरिच जावू शकते एवढ्या अर्वाच्य शब्दात त्यांनी शिवीगाळ केल. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याकडे तक्रार दिली गेली आहे व  ठाणेदार आशिफ़ रझा वर आता कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने  ठाणेदाराची गुंडगिरी त्यांच्यावरचं उलटली असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous articleयंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील – आ. किशोर जोरगेवार
Next article2020 भरती प्रक्रियेतील पोलीस उपनिरीक्षकांची मेरीट लिस्ट प्रकाशित करा – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here