Home चंद्रपूर  मनमानी मनपा प्रशासनाची

 मनमानी मनपा प्रशासनाची

शहरात बोंब पाण्याची 

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेत गत एका वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. महापौर, वाडीतील नगरसेवकांची असलेली पदे संपुष्टात आली आहेत. असे असतांना चंद्रपूर शहर हे अनेक समस्याचे माहेरघर झाले आहे. महानगर पालिकेत अधिकाऱ्यांच्या मन मजीने सर्व कामे सुरू आहेत. लोकप्रतिनिधीच्या नसन्याने शहरातील समस्येवर प्रशासन अधिकाऱ्यांना बोॠणारे वा जाब विचारणारे कोणीही नाही. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहराला अनेक समस्येने घेरले आहे. त्यातवाडीतील साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची समस्या आवासून उभी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी निडर बनून दुर्लक्ष करीत आहेत.

मागील तीन-चार दिवसा पासून भिवापूर वार्डातील नागरिकांना पिण्याच्या पाणी समस्येला नहाक तोंड द्यावे लागत आहे. वाडीत पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. नागरिकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देऊनही त्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित अधिकारी सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तर वाँलमॅन हा सांगकाम्या आहे.

काही दिवसापूर्वीच अवकाळी पावसाने हाहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामध्ये अनेक नुकसान झाले. त्याचाच बहना करुन पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अनेक बहाणे करून वाडीत नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा हेतूपरस्पर बहाना करत आहे. मागील दोन-तीन वर्षापासून चंद्रपूर शहरांमध्ये अमृत योजनेचे काम सुरू आहे. परंतु ते काम अजूनही पूर्णत्वास न गेल्याने ही योजना धुळखात पडली आहे. करोडो रुपयाची लागत असलेल्या या अमृत योजनेची गरज आहे.

योजनेचे तिन -तेरा वाजले की काय? असा प्रश्न आता नागरिकांना वाटू लागला आहे. मनपा प्रशासनाकडे आर्थिक नियोजन नसल्याचे कारण समोर करून अनेक कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी केल्याने शहरामध्ये समस्या तयार झाल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री या समस्येकडे दुर्लक्ष करून इतर कामात व्यस्त असल्याचे चित्र बघावस मिळत आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून करोडो रुपये खर्च करून शहरात अमृत योजनेची पाईपलाईन पक्के रस्ते फोडून टाकण्यात आली. अजूनही शहरातील रस्ते खड्ड्यात असल्याची जान नागरिकांना होतं आहे. मनपा मध्ये राजकीय सत्ता असताना जे काम होत होते. ते काम मनपा प्रशासनाकडून होत नसल्याची बोंब शहरातील नागरिकाकडून होत आहे. निडर झालेल्या अधिकारी कर्मचा? यावर मनपा आयुक्त यांनी वचक ठेऊन निर्माण झालेल्या समस्याकडे गांभीर्याने घेऊन लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here