Home चंद्रपूर सनसनिखेज :- संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ?

सनसनिखेज :- संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ?

रवींद्र शिंदे यांच्यावरील होणाऱ्या संभावित हल्ला प्रकरणी चौकशीला सुरुवात.

चंद्रपूर :-

जिल्ह्यात राजकीय गुंडगिरीचा आता अंत होणार असल्याचं चित्र दिसायला लागलं असून नुकत्याच सीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारांची पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी गंभीर दखल घेत दहा पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेला पाठवून वेगाने तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान या गोळीबारातील एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याची चर्चा असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यावर होणाऱ्या संभावित हल्ला प्रकरणी सुद्धा काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती चर्चेद्वारे समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात कधी नव्हे असे राजकीय वरदहस्त असणारे गुंड धुमाकूळ घालत असल्याचे आजवरच्या राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील लोकांवर जीवघेण्या हल्ल्यातून समोर येतं आहे. अर्थात यासाठी अवैध रेती, अवैध कोळसा व दारू वाहतूक यातून गुंडगिरीला उत् आला आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धेत यांचं गुंड माफियांच्या वापर करून विरोधकांवर हल्ले घडवून आणल्या जात आहे. अर्थात यातून राजकीय वर्चस्वाच्या लढाया होतं असल्याचे चित्र मागील काही वर्षात दिसत असल्याने जिल्ह्यात यूपी बिहार सारखी स्थिती होतांना दिसत आहे. त्यातच सीडीसीसी बैंकेच्या अध्यक्षांवर झालेला गोळीबार हा नेमक्या कुठल्या कारणाने झाला यांचा तपास लागणार आहे पण जर हा गोळीबार करणाऱ्याना राजकीय सुपारी मिळाली असेल तर मात्र जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा पोलीस पर्दाफाश करेल का ? याकडे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले असेल.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचेवर (दि.११ मे ) ला गोळीबार झाला, आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधून काढण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लावून धरली होती. दरम्यान या घटनेतील एक आरोपी पोलिसांना सापडला असल्याचे बोलल्या जात, मात्र पोलिसांनी याबाबत मोठी गुप्तता पाळली आहे. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे माजी अध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट आखनाऱ्या संभावित संशयीताना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येतं आहे. त्यामुळे बैंक अध्यक्ष संतोष रावत व माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे या दोघांनाही टार्गेट करणारे नेमके कोण आहेत ? याबद्दल पोलीस तपास खोलवर गेल्यास पडद्यामागे असणाऱ्यांचे बुरखे फाटनार आहे. आता याबाबत पोलिसांकडून प्रसारमाध्यमांसमोर काय उघड केल्या जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here