Home चंद्रपूर माझ्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही अफवांवर विश्वास ठेवू नका…सत्यपाल

माझ्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही अफवांवर विश्वास ठेवू नका…सत्यपाल

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पोस्ट फिरत आहे त्यामध्ये माझ्यावर हल्ला झाला असे नमूद करण्यात आलेले आहे.वास्तविक पाहता तशी कुठलीही घटना घडलेली नाही.१७ मे २०२३ रोजी माझ्या मोटरसायकलचा किरकोळ अपघात झाला आणि माझ्या उजव्या हाताची हड्डी थोडीशी फ्रॅक्चर झाली,हे सोडून बाकी कुठल्याच प्रकारचा हल्ला वगैरे माझ्यावर काही झालेला नाही.आणि जी न्यूज सोशल मीडिया वर फिरत आहे ती जुनी आहे.त्यामुळे कुणीही अधिकृत माहिती असल्याशिवाय अशी पोस्ट वायरल करू नये आणि त्यावर विश्वास सुद्धा ठेवू नये.मी अगदी बरा आहे,आणि माझे प्रबोधन कीर्तन सुद्धा दररोज सुरू आहेत.असे मत मांडून सत्यपाल यांनी खुलासा करून तमाम महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही प्रकारची अपवाद पसरवू नयेत असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here