Home चंद्रपूर सावधान, पुन्हा मुंबई येथील नेटवर्क कंपनी आली चंद्रपूर लुटायला ?

सावधान, पुन्हा मुंबई येथील नेटवर्क कंपनी आली चंद्रपूर लुटायला ?

राहुल माने संचालित ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल.’ अँधेरी मुंबई येथील नेटवर्क कंपनी मार्फत पुन्हा एकदा चंद्रपुर व विदर्भातील जनतेची फसवणूकीचे रैकेट सुसज्ज।

 चंद्रपूर प्रतिनिधी :-

गेल्या अनेक वर्षापासून मल्टीलेवल नेटवर्क कंपनीच्या माध्यमातून चंद्रपुर तथा नागपुर येथील बेरोजगार युवक तथा भोळयाभाबळया जनतेच्या फसवणुकीचे अविरत सत्र सुरुच आहे, यापूर्वी समृद्ध जीवन, मैत्रेय, कलकाम, साईप्रसाद, साईंप्रकाश, मेट्रो विजन आणि रियल ट्रेड सारख्या अशा अनेक कंपनीच्या माध्यमातून जनतेची लाखो करोडो रूपयांनी फसवणूक झालेली आहे, अशा अनेक कंपनीचे खटले न्यायालयात अजूनही प्रलंबित असून कुणालाही योग्य न्याय तो मिळालेला नाही, तरी सुद्धा ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल.’ अँधेरी मुंबई येथील राहुल माने व त्यांच्या सहकार्या मार्फत संचालित सदर कंपनीच्या माध्यमातून साखळी योजना तयार करुन इन्वेस्टमेंट प्लान चालविला जात आहे.

गेल्या अनेक कंपनी मध्ये या सर्व लोकांनी  मिळून लोकांना अधिक कमीशन चे आमिष दाखवून काम करण्यास भाग पाडलेले आहे, राहुल माने हे कंपनी चे मुख्य संचालक असून लोकांना आपला खुप मोठा ट्रांसपोर्ट, प्रॉडक्ट मैन्युफैक्चरिंग, इम्पोर्ट व एक्पोर्ट चा करोड़ो रूपयाचा व्यवसाय असल्याचे सांगतात. सदर व्यक्ती नालासोपारा येथील एक रियल इस्टेटचे एजेंट म्हणून स्वंयरोजगार करणारे आहेत सोबत च अँधेरी व नालासोपारा येथे बैंक लोन काढून देण्याचे सिंडिकेट सुद्धा चालवतात, अशा व्यक्तिच्या माध्यमातून चालविल्या जात असलेल्या ‘वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल.’ अँधेरी या कंपनी च्या माध्यमातून करोडो रूपयांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे, त्याचप्रकारे इनकारपोरेशन कंपनी अक्ट च्या अंतर्गत कुठल्याही कंपनी ला थेट जनतेची गुंतवणूक घेता येत नाही, करीता चंद्रपुर जिल्यातील पोलिस प्रशासनाने यावर तात्काळ चौकशी करुन सदर कंपनी वर पायबंद घालावा व जे या कंपनीचे संचालक व प्रमोटर आहेत त्यांना अटक करावी अशी जनतेतुन मागणी केल्या जात आहे.

कलकाम च्या गुंतवणूकदारांना अजूनही मिळाला नाही न्याय.

मुंबई नालासोफारा येथील विष्णू दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रपूर व विदर्भात जवळपास 200 कोटी पेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करून पोबारा केला दरम्यान काही राजकीय गुंड लोकांनी यांचा फायदा घेत विष्णू दळवी सोबत संपर्क साधून गुंतवणूकदारांच्या नावाने लाखो रुपये घेऊन गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले दरम्यान पोलीस प्रशासनाने सुद्धा याबाबत मौन पाळले त्यामुळे या कलकाम च्या गुंतवणूकदार एजंट यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असतांना आता वर्सटाइल अटायर आय.एस.पी.एल.’ अँधेरी मुंबई येथील राहुल माने व त्यांच्या सहकार्यानी चंद्रपूर येथे तळ ठोकला असल्याचे समोर आले असल्याने पोलिसांनी यावर त्वरित प्रतिबंध लावावा अन्यथा काही काही राजकीय गिधाडे आपला फायदा उचलून गुंतवणूकदार यांची लूट होऊ देईल व पुन्हा या कंपनीचा कलकाम होईल.

Previous articleमाझी व आरोपींची नार्को टेस्ट करा, मुख्य सूत्रधार समोर येईल – संतोष रावत
Next articleशिक्षणाच्या आईचा घो ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन आश्रमशाळेच्या हजेरीपटात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here