Home चंद्रपूर पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

पोंभूर्णा : पोंभुर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत मका खरेदी केंद्राचे आज उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी मरपल्लीवार व उपसभापती आशिष कावटवार यांचे हस्ते करण्यात आले.मका आवक कमी झालेली असतांना सुद्धा बाजारभावात कमालीची घसरण झालेली आहे. पोल्ट्री उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने उत्पादक शेतकरी मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत वारंवार मागणी करीत होते. पिकांची विविधता, अवाक बघता येथील अन्न पुरवठा विभागाच्या गोदाम मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे मकाची खरेदी करण्यात येत आहे. आज मका खरेदी केंद्राचा शुभारंभ कारीत विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार शाल, श्रीफळ देऊन सत्कार गरीवार, करण्यात आला. यावेळी संचालक वसंत पोटे, रवी लिलाधर गेडाम, वासूदेव पाल, विनायक Dis, अशोक साखलवार, सुनील कटकमवार, प्रवीण पिटूरकर, नैलेश चिंचोलकर, विनोद थेरे, भारती बादन, सुनदा गोहने, सचिव शाम पदम अन्न पुरवठा विभागाचे लिफिक गेडाम, केंद्राचे प्रमुख बुरांडे, आदी कर्मचारी, हमाल, मापारी आदी उपस्थित होते..

Previous articleआमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत वेधले गोंडवाना विद्यापीठातील समस्यांकडे लक्ष
Next articleस्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेच्या वतीने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here