Home चंद्रपूर स्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेच्या वतीने

स्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेच्या वतीने

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे हा एकमेव पर्याय आहे,झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा, सातत्याने वाढणाऱ्या तापमानाला मात देण्यासाठी प्रत्येकानी सार्वजनिक ठिकाणी जाऊन वृक्ष लागवड केली पाहिजे ,या उद्देशाने स्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेच्या महिला (स्त्रीया) नी पुढे येत पर्यायाने जिल्हात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाचा जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत,तसेच जनतेला विविध आजाराने सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे पर्यावरण दिनाचा संकल्प घेऊन येणाऱ्या काळात पर्यावरणासाठी हरित वातावरण निर्माण होईल आणि जनता निरोगी राहील अशी अपेक्षा व्यक्त करून,जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करीत, प्रामुख्याने *संस्थेच्या अध्यक्षा :-सायली येरने उपाध्यक्षा:-ऍड विना बोरकर, सचिव:-संतोषी चव्हाण, कोषाध्यक्ष:-अल्का मेश्राम, सहसचिव:-पूजा शेरकी तसेच माधुरी निवलकर, शम्मा काझी* इत्यादी महिलांनी पुढाकार घेऊन झाडे लावा,झाडे जगवा असा जनतेला संदेश देऊन  मोठ्या उत्साहाने स्त्री शक्ति बहुउदेशीय संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

Previous articleपोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्राचे उद्घाटन
Next articleस्त्री शक्ती बहुउदेशीय संस्थेच्या वतीने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here