Home चंद्रपूर ‘अमृत’ योजनेमुळे यंदा मनपा ची टँकरसंख्यात घट

‘अमृत’ योजनेमुळे यंदा मनपा ची टँकरसंख्यात घट

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानगरपालिकेमार्फत केंद् शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजना सुरू झाली. गेल्यावर्षी उन्हाळ्यात १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. आता पाणी मिळत असल्याने टँकरची संख्या घटून चार झाली आहे. उन्हाळ्यात शहरातील राष्ट्रवादीनगर, आंबेडकरनगर, तुकूम, आंबेडकर भवन परिसर, हवेली गार्डन इत्यादी भागात पाणीटंचाई जाणवायची त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे भाग होते. मागील वर्षी यांत्रिकी विभागामार्फत शहरात १२ टँकरने पाणीपुरवठा केला गेला होता. अमृत योजनेचे बऱ्याच भागातील काम पूर्ण झाल्याने आता या टँकरची संख्या चारवर आली आहे.

आठ टँकर पाणीपुरवठ्याची मागणी कमी झाली. उर्वरित भागातही योजनेचे काम सुरू आहे. अनेक जागी मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले असून, काही जागी शिल्लक आहे. काही किरकोळ गळती दुरुस्ती कामे केली जात आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वाढीव स्वरूपात पाणीपुरवठा केला जातो.

Previous articleपुन्हा एका महिलेची निर्घुण हत्या : मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये उकळले
Next articleछत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार चालविणारे, राष्ट्रवादाचे जिवंत प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here