Home Breaking News लालपरी ४० फुट खोल दरीत कोसळली दोन प्रवासी गंभीर जखमी बाकी सुखरूप...

लालपरी ४० फुट खोल दरीत कोसळली दोन प्रवासी गंभीर जखमी बाकी सुखरूप बचावले

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

अमरावती :-  राज्यात सध्या ST महामंडळाच्या भंगार बसेस रस्त्याने धावताना दिसतात बस पाहूनच आतमध्ये बसून प्रवास करण्याची हिम्मत होत नाही, मात्र दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाजाने प्रवास करवा लागतो. अश्याच एका

भंगार झालेल्या बस मेळघाटातील घटांग येथे ४० फूट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून फक्त २ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. घटांग येथील घाटात असलेल्या आडवळणावर हा अपघात झाला आहे. खंडवा कडून अमरावती कडे ही बस येत होती दरम्यान ब्रेक पाईप फुटल्याने हा अपघात झाला आहे. या बसमध्ये ४० ते ५० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ST महामंडळाच्या भंगार बसेस मेळघाटच्या घाटातून चालत असल्याने नागरिकांनी नवीन आणि चांगल्या बसेस मेळघाटात द्याव्यात अशी मागणी केली आहे.

Previous articleतुम्ही नळ टॅक्स भरला का मनपाची कारवाई नेहरू नगरसह अनेक प्रभागातील नळ जोडणी खंडित
Next articleबालकामगार प्रतिबंधक दिनी राबविणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here