Home चंद्रपूर बालकामगार प्रतिबंधक दिनी राबविणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

बालकामगार प्रतिबंधक दिनी राबविणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  बालकामगारांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने जागतिक बालकामगार विरोधी दिनी चंद्रपुरातील पडोली येथील बिट्ट नागी बॉडी बिल्डर वर्क्स व कश्मिरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूर या धोकादायक उद्योगामध्ये काम करणाऱ्या तीन बालकामगारांना व्यावसायिकांवर करण्यात आला आहे. ताब्यात घेऊन गुन्हा दाखल

मुले स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार, कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ सफाई करायची, भांडी कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे, अशी अनेक कामे करावी लागतात. जागतिक बालकामगार विरोधी दिनी जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगार उपायुक्त

एम. पी. मडावी यांच्या मार्गदर्शनात दुकाने निरीक्षक गायत्री दुबे व त्यांच्या चमूंनी पडोली येथील बिदु नागी बॉडी बिल्डर वर्क्स व कश्मिरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूर येथे तीन बालकामगार काम करताना आढळून आले. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बिदू नागी बॉडी बिल्डर वर्क्सच्या मालकावर पडोली ठाण्यात तर कश्मिरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूरच्या मालकावर रामनगर  ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कोण आहेत बालकामगार ?

बालकामगार (प्रतिबंध कायदा १९८६ नुसार १४ वर्षाखाली मुलांना कामावर ठेवण्यास मनाई आहे. केंद्र सरकारने या कायद्यात सन २०१५ मध्ये बदल करुन १८ वयोगटातील मुलांना कामवर ठेवण्यास मनाई केली आहे.

बालकामगार प्रतिबंधक व नियमन कायद्यानुसार १८ वर्षाखालील मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार गुन्हा व दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे कुणीही बालकामगारांकडून काम करवून घेऊ नये. कुठे बालकामगार राबत असल्यास कामगार आयुक्त कार्यालयाला माहिती द्यावी.

Previous articleलालपरी ४० फुट खोल दरीत कोसळली दोन प्रवासी गंभीर जखमी बाकी सुखरूप बचावले
Next articleपुन्हा एकदा माझी नगरसेवक सुभाष कासंनगोट्टीवार आले धावून माहाकाली कॉलरी मधील नागरिकाना मोठा दिलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here